rohit sharma  Esakal
क्रीडा

Rohit Sharma: विश्वचषकासाठी रोहित शर्माचा काय आहे प्लॅन? म्हणाला, विक्रमांचा...

What is Rohit Sharma's plan for the World Cup?

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma: अफगाणिस्तान संघाविरुद्ध दणकट खेळ करून मोठा विजय संपादल्यावर भारतीय संघातील खेळाडूंच्या चेहऱ्‍यावर समाधान होते. चांगल्या खेळाबरोबर नेट रन रेट उंचावल्याचे समाधान जास्त होते.

एकाच शतकी खेळीत एकापेक्षा जास्त विक्रम करणारा कप्तान रोहित शर्मा सामन्यानंतर बोलताना शांत होता. विक्रमांचा आनंद आहे. एक नक्की आहे की, माझ्या डोक्यात विचार फक्त विश्वचषक मोहिमेचा आहे, विक्रमांचा नाही, रोहितने एकाच वाक्यात स्पष्ट केले.

अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी मन लावून खेळी केल्याने आम्हाला चांगले आव्हान पेलावे लागले होते. अर्थात अरुण जेटली मैदानाची खेळपट्टी फलंदाजीला खरंच उत्तम होती. फलंदाजी चालू केल्यावर ध्यानात आले की, चेंडू बॅटवर छान येतोय. मग क्षेत्ररचनेच्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेऊन थोडासा धोका पत्करून काही फटके मुद्दाम मारले.

गोलंदाजांवरचे दडपण वाढवण्यात यश आल्यावर पुढच्या गोष्टी शक्य झाल्या. मला चांगली फलंदाजी जमायला लागली की मी अर्धवट खेळी करणे टाळतो. संघाची गरज लक्षात घेऊन दीर्घकाळ खेळायचा प्रयत्न करतो. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने चांगले वर्चस्व गाजवत खेळ केला याचे समाधान आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.

आईची भेट होईल : बुमरा
चार फलंदाजांना बाद करणारा जसप्रीत बुमरा नेहमीप्रमाणे अगदीच शांत होता. मी यश-अपयशाने फार आनंदी किंवा दु:खी होत नाही. माझे लक्ष माझ्या तयारीवर असते. तीन सत्रांत मला गोलंदाजी करून योग्य परिणाम साधता आला याचे बरे वाटले. आता पुढचा सामना मी माझ्या घरच्या मैदानावर, म्हणजेच अहमदाबादला खेळणार आहे.

माझ्या आईला भेटणार आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर मी कसोटी सामना खेळलोय, पण एकदिवसीय सामना पहिल्यांदाच खेळणार असल्याने वेगळीच मजा येणार आहे, बुमराने मंद स्मित करत पत्रकारांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT