esakal
क्रीडा

अमेरिकेत क्रिकेटचं युद्ध, वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यात होणार लढत

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार.

धनश्री ओतारी

बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्टइंडिजने बुधवारी भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. तसेच, जारी केलेल्या निवेदनात भारतीय संघ फ्लोरिडा, यूएसए येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतील काही सामने खेळणार असल्याचे म्हटलं आहे.

त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि सेंट किट्स आणि नेव्हिसमध्ये एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 सामने खेळवले जातील. शेवटचे दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडरहिल येथे होणार आहेत. संपूर्ण मालिका 'फॅनकोड'वर थेट प्रक्षेपित केली जाईल.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने आगामी मालिकेबद्दल सांगितले की, "आमच्याकडे एक युवा संघ आहे जो वेस्ट इंडिजचा संघ ज्या प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे ते दाखवण्यासाठी उत्सुक आहे."

वनडे

पहिली वनडे: २२ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

दुसरी वनडे: 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

तिसरी वनडे: २७ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता

T20 आंतरराष्ट्रीय सामना

पहिला T20: 29 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

दुसरा T20: 1 ऑगस्ट, सेंट किट्स आणि नेव्हिस

तिसरा T20: 2 ऑगस्ट, सेंट किट्स आणि नेव्हिस

चौथी T20: 6 ऑगस्ट, फ्लोरिडा, यूएसए

पाचवी T20: 7 ऑगस्ट, फ्लोरिडा, यूएसए

सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून खेळवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT