Wimbledon Controversy Australian Tennis Player Nick Kyrgios Spitting in the direction of a hassling fan esakal
क्रीडा

Wimbledon : ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रेक्षकांच्या दिशेने थुंकला; लाईन जजवरही भडकला

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गियोसने (Nick Kyrgios) विंबल्डनच्या पहिल्याच फेरीत वादग्रस्त वर्तन केले. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने ब्रिटनचा टेनिसपटू पॉल जूब विरूद्धच्या सामन्यात प्रेक्षकांच्या दिशेने थुंकणे, अंपायरला चाड्या करणारा संबोधणे असे प्रकार केले. त्यानंतर त्याने पॉलला 3-6, 6-1, 6-7 (3), 7-5 असे हरवल्यानंतर देखील प्रेक्षकांना टोमणा मारला. तो म्हणाला की प्रेक्षक मला सारखे त्रास देत होते. तो सामन्यादरम्यान लाईन जजवरही भडकला होता.

विंबल्डन (Wimbledon) सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत झालेल्या या प्रकारामुळे चाहते आणि प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. निकला फक्त सोशल मीडियावर ट्रोल केलं जात नसून आता टेनिस कोर्टवर देखील प्रेक्षक त्याच्यावर टोमण्यांचा वर्षाव करत आहेत.

निक किर्गियोसने यापूर्वी स्टुटगार्ड ओपन (Stuttgart Open) टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांकडून वर्णभेदी टिप्पणी झाल्याचा आरोप केला होता. ज्यावेळी त्याने सेमी फायनलमध्ये अँडी मरेला पराभूत केले त्यावेळी प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णभेदी टिप्पणी केली होती. किर्गियोतने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली की सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून अपमानजनक टिप्पणी करण्यात आली. हे सगळं कधी थांबणार आहे.? असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला.

किर्गियोसने सांगितले की, 'मला माहिती आहे की माझे वागणे प्रत्येकवेळी चांगले नसते. मात्र वर्णभेदी टिप्पणी कधीही स्विकारण्यात येणार नाही. ज्यावेळी मी प्रेक्षकांना प्रत्युत्तर देतो त्यावेळी मला दंड केला जातो. हे योग्य नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

Horoscope Prediction : पुढच्या 72 तासात 'या' 4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार; पाहा यात तुमची रास आहे का?

Ashes, 1st Test: 0,0,0...इंग्लंड-ऑस्ट्रेलियन ओपनर आधी गंडले, मग घोंगावलं ट्रॅव्हिस हेडचं वादळ! कांगारुंनी दोनच दिवसात जिंकली मॅच

एकदम कातिल! रेखाच्या एव्हरग्रीन गाण्यावर रिंकू राजगुरूचा जबरदस्त डान्स; दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ

Movie Review : असंभव - मानवी भावभावनांची रहस्यमय गुंफण

SCROLL FOR NEXT