women junior asia cup 2023 hockey india defeats japan 1 0-qualify for junior women s hockey wc 2023 final esakal
क्रीडा

Women Junior Asia Cup 2023 : भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

सुनेलिताच्या गोलाने भारताने उपांत्य सामन्यात जपानचा १-० असा पराभव

सकाळ वृत्तसेवा

काकामिगारा : सुनेलिता तोप्पो हिने केलेल्या एकमेव आणि निर्णायक गोलाने भारताची दोन उद्दिष्ट्ये पार झाली. एक तर ज्युनियर महिला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले, त्याचबरोबर ज्युनियर महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली. सुनेलिताच्या गोलाने भारताने उपांत्य सामन्यात जपानचा १-० असा पराभव केला.

ज्युनियर गटाची विश्वकरंडक स्पर्धा सँतियागो येथे २९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत होत आहे. या आशिया कप स्पर्धेत पहिले तीन क्रमांक मिळवणारे देश ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

ज्युनियर आशिया कप स्पर्धेत भारताने २०१२ नंतर दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यजमान जपानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या तीन सत्रांत एकही गोल झाला नव्हता. बरोबरीची ही कोंडी सुनेलिताने ४७ व्या मिनिटाला फोडली. तिने केलेला गोल सामन्यातला एकमेव आणि निर्णायक गोल ठरला. आता उद्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा विजेतेपदाचा मुकाबला कोरियाविरुद्ध होईल.

भारत आणि जपान यांच्यातील हा सामना कमालीचा चुरशीचा झाला. दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना एक इंचही देत नव्हते इतका संघर्ष झाला. सुनेलिताला मात्र थोडीशी संधी मिळाली आणि त्याचे तिने सोने केले. सामन्यात जोरदार संघर्ष झाला तरी गोल करण्याच्या तेवढ्याच संधीही मिळाल्या होत्या. दोघांनाही प्रत्येकी १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु त्यावर एकही गोल झाला नाही.

या स्पर्धेत प्रभावी खेळ करत असलेल्या भारताने सुरुवात जोरदार आक्रमक खेळाने केली. चेंडूचा ताबा आपल्याकडेच राखत गोल करण्याच्या काही संधी मिळवल्या होत्या. त्यानंतर संधी मिळताच जपानेही भारतीय गोलक्षेत्रात आक्रमण केले होते. आक्रमण-प्रतिआक्रमणाचा हा खेळ इतका जोरदार होत होता की दोन्ही संघांत डावे-उजवे करणे कठीण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT