क्रीडा

World Cup 2023 : आफ्रिकेच्या क्रिकेटरने केली 'ओम' अन् 'जय श्री हनुमान' पोस्ट; पाकवरच्या विजयानंतर चर्चेत

Kiran Mahanavar

World Cup 2023 Keshav Maharaj : श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात अंतिम क्षणी मोहम्मद नवाझचा चेंडू केशव महाराजने सीमापार धाडला आणि दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवला. त्यानंतर भरमैदानात महाराजने केलेला जल्लोष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

या थरारक विजयानंतर केशव महाराजने इंस्टाग्रामवर केलेली पोस्टही लक्षवेधक ठरली. देवावार आपला विश्वास आहे, असे म्हणत 'ओम'चा तर उल्लेख केलाच; त्याचबरोबर जय श्री हनुमान, असेही म्हणत नमन केले.

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज आणि तेवढाच भरवशाचा फलंदाज असलेला केशव महाराज हिंदू असून त्याच्या कुटुंबाची मुळे भारतात रुजलेली आहेत. भारतात आल्यावर तो दक्षिणेकडील सर्व मंदिरांत जाऊन नमन करत असतो.

पाकविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेला विजयासाठी धावांची गरज असताना महाराजने अंतिम फलंदाज शम्सीसह धैर्याने फलंदाजी केली आणि विजयी चौकार मारल्यानंतर जल्लोष केला. त्यानंतर भरमैदानात तो हनुमानाचे आभार मानताना दिसत होता. केशवला गोलंदाजीत एकही विकेट मिळवता आली नसली, तरी फलंदाजीत केलेल्या नाबाद सात धावा सामन्याचा निकाल बदलणाऱ्या ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT