World Cup 2023 Point Table  esakal
क्रीडा

World Cup 2023 Point Table : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरूद्ध निसटता विजय; मात्र पॉईंट टेबलमध्ये फायदा झाला की नाही?

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Point Table : वर्ल्डकप 2023 च्या धरमशाला येथे झालेल्या लीग सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 389 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने 383 धावांपर्यंत मजल मारली. मात्र शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाने विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलिया अवघ्या 5 धावांनी विजय मिळवला.

या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला पॉईंट टेबलमध्ये फायदा झाला असून आता ते पहिल्या चार संघात आले असून त्यांची सेमी फायनल खेळण्याची आशा वाढली आहे. ऑस्ट्रेलियाचे सध्या आठ गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत.

मात्र पराभवानंतरही न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. त्यांचेही 6 सामन्यात 4 विजयासह 8 गुणच झाले आहेत. नेट रनरेट हे +0.970 असे चांगले असल्याने त्यांचे तिसरे स्थान अबाधित राहिले आहे. सध्या गुण तालिकेत 10 गुणांसह दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. तर सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवणारा भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलिायने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅविस हेडच्या 109 आणि डेव्हिड वॉर्नरच्या 81 धावांच्या जोरावर सर्वबाद 388 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचे 389 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने देखील ऑस्ट्रेलियाला तगडे आव्हान दिले. युवा रचिन रविंद्रने 116 धावांची झुंजार शतकी खेळी केली. त्याला डॅरेल मिचेलने 54 धावा करून चांगली साथ दिली. यानंतर नीशमने 58 धावा करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT