WPL MIW vs RCBW Live
WPL MIW vs RCBW Live  ESAKAL
क्रीडा

WPL MIw vs RCBw : हरमनच्या मुंबईचा सलग दुसरा विजय; स्मृतीच्या आरसीबीची पाटी कोरीच

अनिरुद्ध संकपाळ

WPL MIw vs RCBw Live : मुंबईची सालामीवीर हेली मॅथ्यूजने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हेलीने 38 चेंडूत केलेल्या नाबाद 77 धावांच्या जोरावर मुंबईने आरसीबीचे 156 धावांचे आव्हान 14.2 षटकातच पार केले. मुंबईने सामना 9 विकेट्सनी जिंकत WPL लीगमधील आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मॅथ्यूजला नॅट सिवर ब्रंटने नाबाद 55 धावा करत चांगली साथ दिली.

मॅथ्यूजने आपल्या 202.63 च्या सरासरीने 38 चेंडूत नाबाद 77 धावा ठोकल्या. त्यात 13 चौकार आणि 1 षटकार देखील मारला.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंंडियन्सविरूद्ध दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीचे 4 फलंदाज अवघ्या 2 षटकात गारद करत सामन्यावर आपली पकड पुन्हा निर्माण केली. मात्र आरसीबीच्या मधल्या फळीतील रिचा घोष (28), कनिका अहुजा (22) श्रेयांका पाटील (23) यांनी आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. मुंबईने आरसीबीला 155 धावात रोखले. मुंबईकडून हेले मॅथ्यूजने 3 तर सैका इशाक आणि एमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईने 15 षटकातच पार केले लक्ष्य

हेली मॅथ्यूजच्या नाबाद 77 तर नॅट सिवर ब्रंटच्या नाबाद 55 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडिन्सने आरसीबीचे 155 धावांचे लक्ष्य 14.2 षटकात एका विकेट्सच्या मोबदल्यातच पार केले.

हेली मॅथ्यूजची दमदार फलंदाजी

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 156 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर हेली मॅथ्यूजने पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला. तिला यस्तिका भाटियाने 19 चेंडूत 23 धावा करत चांगली साथ दिली. मात्र तिला प्रिती बोसने बाद करत ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर मॅथ्यूजने नॅट सिवर ब्रंटच्या साथीने मुंबईला 10 षटकात 95 धावांपर्यंत पोहचवले. हेलीने 26 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

146-8 : श्रेयांकाची झुंजार खेळी संपली

रिचा बाद झाल्यानंतर श्रेयांका पाटीलने मेगन स्कॉट्सच्या साथीने आरसीबीला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र श्रेयांकाची 15 चेंडूत केलेली 23 धावांची इनिंग नॅट सिवर ब्रंटने संपवली.

112-7 : आरसीबीची आशा रिचा देखील माघारी

आरसीबीचे रथी महारथी माघारी परतले असताना रिचा घोष एकटी मैदानात लढत होती. मात्र तिला हेली मॅथ्यूजने 28 धावांवर बाद करत आरसीबीला सातवा धक्का दिला.

105-5 (12.2 Ov) : रिचा - कनिका जोडीने आरसीबीची शंभरी पार

आरसीबीचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर 19 वर्षाची रिचा घोष आणि कनिका अहुजा या जोडीने डाव सावरत 12 षटकात आरसीबीचे शतक धावफलकावर लावले.

71-5 : रिचाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

आरसीबीची टॉप ऑर्डर अर्धशतकाच्या आतच माघारी गेल्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र 7 चेंडूत 13 धावा करणारी पेरी धावबाद झाली अन् सर्व जबाबदारी 19 वर्षाच्या रिचा घोषवर येऊन पडली.

43-4  : स्मृती ठरली आरंभशूर

हेली मॅथ्यूजने आरसीबीची सलामीवीर स्मृती मानधनाला 23 धावांवर बाद केले. त्यानंतर लगचे हेथर नाईटला शुन्यावर बाद करत आरसीबीची अवस्था 2 बाद 39 वरून 4 बाद 43 अशी केली.

39-2 : इशाकने जोडी फोडली. 

आरसीबीच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि सोफी डिवाईन यांनी 24 चेंडूत 35 धावा चोपून चांगली सुरूवात केली. मात्र पाचव्या षटकात डावखुरी फिरकी गोलंदाज इशाकने पहिल्यांदा सोफी डिवाईनला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या दिशा कसातचा शुन्यावर त्रिफळा उडवत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

35-0 (4 Ov) : आरसीबीची दमदार सलामी

रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि सोफी डिवाईन यांनी आरसीबीला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या चार षटकात नाबाद 35 धावा केल्या.

स्मृतीने नाणेफेकीत मारली बाजी

स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT