Wrestler Antim Panghal Story Of Unique Name first Indian woman to win a gold medal Under-20 Wrestling World Championships esakal
क्रीडा

Antim Panghal : मुलगी नको म्हणून 'अंतिम' नाव ठेवलेली बनली भारताची पहिली 'गोल्डन गर्ल'

अनिरुद्ध संकपाळ

Antim Panghal Under-20 Wrestling World Championships : भारताच्या अवघ्या 17 वर्षाच्या अंतिम पांघलने 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम पांघलने फक्त सुवर्ण पदक जिंकले नाही तर 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तूपटू देखील बनली. याचबरोबर भारताने 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 7 पदके मिळवत सांघिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले.

अंतिम पांघलने 53 किलो वजनी गटाच्या सुवर्ण पदकाच्या सामन्यात कझाकिस्तानच्या अल्तयन शाकायेव्हाचा 8 - 0 असा सहज पराभव केला. अंतिम पांघलने याच वर्षी आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील सुवर्ण पदकाची कमाई केली होती. भारताची ही महिला कुस्तीतील युवा पिढी आहे. दरम्यान, आपल्या सुवर्ण कामगिरीबरोबरच वेगळ्या धाटणीच्या नावामुळेही ही 17 वर्षाची कुस्तीपटू चर्चेत आली आहे.

अंतिम पांघलची आई कृष्णा कुमारी यांनी अंतिमच्या नावामागची गोष्ट सांगितली. कृष्णा कुमारी म्हणाल्या की, 'आम्हाला एकूण चार मुली आहेत. त्यामुळे आम्ही या शेवटच्या मुलीचे नाव अंतिम ठेवले कारण आम्हाला अजून मुली नको होत्या. ही शेवटची मुलगी म्हणून तिचे नाव अंतिम ठेवले.'

अंतिम पांघलच्या नावाची गोष्ट जरी नकारात्मक दृष्टीकोणातील असली तरी ती आपल्या दमदार कामगिरीने ही गोष्ट सकारात्मकतेमध्ये बदलत आहे. ती आता महिला कुस्ती विश्वात 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तूपटू देखील बनली आहे. म्हणजे अंतिम असलेली आता पहिली झाली आहे.

अंतिम पांघल सोबत अजून सहा कुस्तीपटूंनी देखील पदकाची कमाई करत भारताला सांघिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचवले. 76 किलो वजनी गटात प्रिया मलिकने रौप्य, 62 किलो वजनी गटात सोनम मलिकने रौप्य, 65 किलो वजनी गटात प्रियांकाने रौप्य, 57 किलो वजनी गटात सितोने कांस्य, 72 किलो वजनी गटात रितिकाने कांस्य तर 50 किलो वजनी गटात प्रियांशीने देखील कांस्य पदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

Cyber Fraud : एमएनजीएलच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा वाढता धोका; ग्राहकांची कोंडी, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह!

SCROLL FOR NEXT