wtc final 2023 india-vs-australia-oval-pitch-green-top-wickets 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियासाठी वाईट बातमी! WTC Finalच्या आधी आलेल्या 'त्या' फोटोनंतर वाढल टेन्शन

टीम इंडियाच्या गोटात वाढलं टेन्शन!

Kiran Mahanavar

Ind vs Aus ICC WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

खरं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी केनिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचे फोटो समोर आले आहे. या खेळपट्टीचा फोटो पाहून टीम इंडियाची तारांबळ उडू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ही खेळपट्टी उपलब्ध झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

Espncricinfo ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी केनिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या खेळपट्टीवर भरपूर हिरवे गवत दिसत आहे. या हिरव्यागार खेळपट्टीवर भारताचे फलंदाज उतरले तर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करू शकतात.

हिरव्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. इंग्लंडच्या थंड, ड्यूक्सच्या लहरी चेंडूंसमोर भारतीय फलंदाज हतबल होतात. या खेळपट्टीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला तेव्हा टीम इंडियाने फिरकी खेळपट्ट्यांवर कसोटी मालिकेत त्यांचा 2-1 असा पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलियन संघही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बदला घेण्याच्या मूडमध्ये आहे.

ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे ग्रीन टॉप विकेटवर भारतासाठी घातक ठरू शकतात. जेव्हा जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडतात तेव्हा फक्त चेंडू आणि बॅटचा मुद्दा नसतो. किरकोळ तू-तू मैं-मैं ते मैदानाबाहेरील वाद हे अनेकदा मथळ्यांचा भाग बनतात. या वादांमुळे दोन्ही देशांमधील संघर्षाची उत्कंठा वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT