Ravi Shastri Virat Kohli WTC esakal
क्रीडा

Ravi Shastri Virat Kohli WTC : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटची सकाळ वेगळीच असते... रवी शास्त्रींचा कांगारूंना इशारा

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Shastri Virat Kohli WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा ओव्हलवर होणार आहे. या सामन्यात नुकताच आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पूर्णपणे परतलेल्या विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियाविरूद्धचे कसोटी रेकॉर्ड हे दमदार आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 24 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 48.29 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत. यात 8 षकरी खेळींचा देखील समावेश आहे.

हाच धागा पकडून भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि विराट कोहलीचे मोठे प्रशंसक रवी शास्त्रींनी कांगारूंना इशारा दिला. हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रवी शास्त्री म्हणतात की, 'ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना असेल तर विराट कोहलीची सकाळ काही वेगळीच असते. तो समोर ऑस्ट्रेलिया असेल तर तो त्वरित फ्रेश होतो. जर त्याने धावा करण्यास सुरूवात केली, त्याने 20 धावा केल्या तर त्याला पाहताना मजा येईल.'

विराट कोहलीने WTC Final पूर्वी सांगितले की, जेव्हापासून भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे तेव्हापासून भारतीय संघाला आता कोणीही हलक्यात घेऊ शकत नाही. लंडनमध्ये असणारा विराट स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामने यापूर्वी खूप अटीतटीचे, प्रतिस्पर्धेचे असायचे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात तंग वातावरण असायचं. मात्र ऑस्ट्रेलियात आम्ही 2 मालिका जिंकल्यानंतर ही प्रतिस्पर्धा आदरामध्ये परावर्तित झाली आहे.

विराट पुढे म्हणाला की, 'कसोटी संघ म्हणून भारताला कोणीही हलक्यात घेऊ शतक नाही. आता प्रतिस्पर्धी संघ आम्हाला किती आदर देतोय हे आम्ही पाहतोय. ते आमच्याकडून त्यांच्या घरच्या मैदानात देखील कडवी टक्कर देतील अशी अपेक्षा करत असतात.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT