WTC Final Race New Zealand dominated Sri Lanka but benefited team India cricket news in marathi kgm00 
क्रीडा

WTC Final : ख्राईस्टचर्चमध्ये लंकेवर न्यूझीलंडचे वर्चस्व अन् फायद्यात टीम इंडिया

भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम प्रवेश निश्चित...

सकाळ ऑनलाईन टीम

WTC Final Race : डँरैल मिशेलचे शतक आणि मॅट हेन्रीच्या ७२ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेवर उलटवार केला आणि हा पहिला कसोटी सामना जिंकण्याची स्थिती निर्माण केली. १८ धावांची आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची ३ बाद ८३ अशी अवस्था केली. हा सामना न्यूझीलंडने जिंकला किंवा अनिर्णित राहिला तरी भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित होणार आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ३५५ धावांना सामोरे जाताना न्यूझीलंडची ६ बाद १८८ अशी अवस्था झाली होती; परंतु मिशेलचे शतक हेन्रीची अर्धशतकी खेळी आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या मौल्यवान योगदानामुळे न्यूझीलंडने ३७३ धावा केल्या. दिवसअखेर श्रीलंकेने ३ फलंदाज ८३ धावांत गमावल्यामुळे आता त्यांच्याकडे ६५ धावांचीच आघाडी आहे.

आज तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा मिशेल ४०; तर ब्रेसवेल ९ धावांवर खेळत होते. ब्रेसवेल लगेचच बाद झाल्यामुळे न्यूझीलंडवरचे दडपण वाढले; मात्र कर्णधार साऊदीने मिशेलला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका, पहिला डाव : ३५५

न्यूझीलंड, पहिला डाव १०७.३ षटकांत ३७३ (टॉम लॅथम ६७, डेव्हन कॉन्वे ३०, डॅरेल मिशेल १०२, मिशेल ब्रेसवेल २५, टिम साऊदी २५, मॅट हेन्री ७२, निल वँगनर २७, कासून रजिता ३१-१०-१०४-२, असिता फर्नांडो २९.३-५-८५-४, लाहिरू कुमारा २५-५-७६-३).

श्रीलंका, दुसरा डाव : ३८ षटकांत ३ बाद ८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chhagan Bhujbal : ‘कुणबी’चा आदेश मागे घ्यावा; ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका

मोहोळ तालुका हादरला! गलंदवाडी येथील दांपत्यास कोयत्याने मारहाण करून दरोडा; दोघेजण जखमी, जीवे मारण्याची धमकी अन्..

SCROLL FOR NEXT