क्रीडा

WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागलं आहे. विराट कोहलीनं WTC Final जिंकल्यास त्याच्या नेतृत्वातील हा पहिला आयसीसी (ICC) चषक असेल. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील लढत तुल्यबळ होणार असल्याची चर्चा क्रीडा जगतात आहे. पण बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यूझीलंडचे दिग्गज माजी खेळाडू रिचर्ड हेडली (Richard Hadlee) यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हेडली यांनी विजेत्याबाबत भाकीत केलं आहे. रिचर्ड हेडली (Richard Hadlee) यांच्यामते विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या विजेत्याबाबत आताच भाकीत करणं थोडं कठीण आहे. विजेतेपदासाठी दोन सर्वोत्कृष्ट संघ समोरासमोर आले आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दोन्ही संघ अव्वल आहेत. (wtc final richard hadlee shares his thoughts on who will be winner between india and new zealand)

भारत नंबर 1 तर न्यूझीलंड 2 -

आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमन आहे. 18 जून ते 22 जून रोजी दोघांमध्ये सामना होणार आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्या रुपानं जगातील दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज समोरासमोर आले आहेत. हेडली यांच्यामते, इंग्लंडमधील थंड परिस्थिती न्यूझीलंडच्या बाजूनं आहेत. पण जो संघ इंग्लंडमधील परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेऊन तो संघ चषकावर नाव कोरेल.

रिचर्ड हेडली काय म्हणाले-

सर्वोत्तम तयारी आणि इंग्लंडमधील परिस्थितीसोबत जुळवून घेणारा संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर नाव कोरेल. इंग्लंडमध्ये हवामान सर्वात मोठी भूमिका बजावू शकते. येथील वातारण थंड असून ते न्यूझीलंडच्या बाजूनं आहे. स्विंग करणाऱ्या गोलंदाजाला येथील वातावरणात जास्त यश मिळेल. न्यूझीलंडमध्ये स्विंग गोलंदाजांचा भरणार आहे. साउथी, बोल्ट आणि जेमीसन या गोलंदाजाकडे स्विंग करण्याची क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट फंलदाज आणि गोलंदाजांचा भरणा आहे, त्यामुळे सामना पाहण्यासारखा होईल. सध्या विजेत्या संघाबाबत भाकीत करणं कठीण आहे. मागील दोन्ही आयसीसी चषकात न्यूझीलंड संघ फायनलमध्ये पराभूत झालाय. दोन्ही संघ दबावाशिवाय क्रिकेटचा आनंद घेतील.

आयसीसी सामन्यात न्यूझीलंडचं प्रदर्शन शानदार-

हेडली म्हणाले की, "50 षटकांच्या विश्वचषकात न्यूझीलंड संघाचा गौरवपूर्ण विक्रम आहे. अखेरच्या क्षणी गमावलेल्या सामन्यामुळे वाइट वाटतं. 2019 मध्ये झालेल्या अंतिम सामना जिंकलाच होता, पण अखेरच्या क्षणी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडला नशीबाची साथ मिळाली होती. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा तटस्थ ठिकाणी आहे. त्यामुळे दोन्ही संघाला विजयाची समान संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT