rishabh pant
rishabh pant  Twitter
क्रीडा

WTC Final : किवींना पंत-शुभमनचेही टेन्शन!

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अवघ्या काही तासांनी सुरु होईल. 18 ते 22 जून या कालावधीत साउथहॅम्प्टनच्या मैदानात मेगा फायनल रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळत फायनलची जय्यत तयारी केली आहे. न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज टिम साउदी याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी धमाकेदार कामगिरी केलीये. इंग्लंड विरुद्ध भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजाच्या मनात टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरची धास्ती आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच नव्हे तर रिषभ पंत आणि शुभमन गिल यांना रोखणेही मोठे चॅलेंज असल्याचे किवी गोलंदाजाने सामन्यापूर्वी म्हटले आहे.

न्यूझीलंडकडून 78 कसोटी सामन्यात 309 विकेट मिळवणाऱ्या साउदीने फायनलसाठी कसून सराव केलाय. न्यूझीलंडच्या ताफ्यातील तो प्रमुख गोलंदाज आहे. भारतीय संघाविरुद्ध जिंकायचे असेल तर गोलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे साउदीने म्हटले आहे. रोहित शर्मा तिन्ही प्रकारातील उत्तम फलंदाज आहे. रोहितची बॅटिंग पाहण्यात स्वत: एक वेगळा आनंद मिळतो, असेही तो म्हणाला. रोहित शर्मा सामन्याचे पारडे एकटा झुकवू शकतो, असा उल्लेखही साउदीने केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करताना सीनियर खेळाडूंचेच नव्हे तर शुभमन गिली आणि रिषभ पंत यांच्या व्हिडिओचा अभ्यास केल्याचेही त्याने सांगितले.

रिषभ पंतची भूमिका ठरेल महत्त्वाची

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने जबरदस्त कामगिरी नोंदवली होती. 23 वर्षीय विकेटकीपर फलंदाजाकडून न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. पंतने या वर्षी 6 कसोटी सामन्यात 64.37 च्या सरासरीने 515 धावा केल्या आहेत. यात एका शतकासह 4 अर्धशतकांचा समावेश आहे. पंतचा स्ट्राइक रेट हा 77 राहिला आहे. पंत फायनलमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे.

न्यूझीलंड विरुद्ध रेकॉर्ड सुधारण्याचे चॅलेंज

टीम इंडियासह रिषभ पंतचे न्यूझीलंड विरुद्धचे मागील रेकॉर्ड टेन्शनदायी आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात पंतने 15 च्या सरासरीने केवळ 60 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये त्याचे रेकॉर्ड उत्तम असून न्यूझीलंड विरुद्ध तो चांगली कामगिरी करुन रेकॉर्डमध्ये सुधारणा करेल, अशी आशा आहे. टीम इंडियाला देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हे दोन्ही कसोटी सामने न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर झाले होते. त्रयस्त ठिकाणी टीम इंडिया किवींना त्रस्त करुन हा रेकॉर्डही बदलणार का? हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT