ash Dhull Under19 India Cricket Team Captain Give Success Credits To VVS Laxman  esakal
क्रीडा

Video: 'यश'च्या यशाचा मास्टर माईंड लक्ष्मण

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup: आयसीसी १९ वर्षाखाली वर्ल्डकप २०२२ (ICC Under 19 World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात येत आहे. काल इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघाने अफगाणिस्तानच्या १९ वर्षाखाली संघाचा पराभव करत फायनल गाठली. तर आज भारताचा १९ वर्षाखालील संघ (India National Under‑19 Cricket Team) ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघाशी(Australia National Under‑19 Cricket Team) आज सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार यश धुल(Yash Dhull) सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरा गेला. त्यावेळी भारतीय संघाच्या यशात एनसीएचे (National Cricket Academy) नवनियुक्त प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांचेही मोठे योगदान असल्याचे सांगितले.

यश धुलने लक्ष्मणची (VVS Laxman) प्रशंसा करत सांगितले की, 'लक्ष्मण सर आमच्या बरोबर आहेत. ते आपला अनुभव आमच्यासोबत शेअर करतात. हा अनुभव येणाऱ्या सामन्यांसाठी फार उपयुक्त आहे. महत्वांच्या सामन्याला कसे सामोरे जायचे हे ते सांगतात.'

यश धुलने (Yash Dhull) पहिल्यांदाच लक्ष्मणची स्तुती केलेली नाही. यापूर्वीही लक्ष्मणच्या मार्गदर्शनाबद्द तो भरभरून बोलला आहे. लक्ष्मणच्या मार्गदर्शनाबद्दल धूलने त्याचे आभार देखील मानले होते. त्याने 'संघात प्रत्येक दिवशी सुधारणा होत आहे. लक्ष्मण सर त्यांचा अनुभव आमच्या शेअर करत आहेत. ज्याचा आम्हाला चांगला फायदा होत आहे. सेमी फायनलला आम्ही खेळपट्टीनुसार आमची रणनीती ठरवणार आहोत.' असे वक्तव्य केले. आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामना हा अँटिग्वाच्या कॉलेज क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० ला सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : जहाल माओवादी हिडमासह त्याची पत्नीही ठार

SCROLL FOR NEXT