PCB Zaka Ashraf
PCB Zaka Ashraf sakal
क्रीडा

PCB Zaka Ashraf : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! पीसीबीच्या अध्यक्षांनी पदाचा दिला राजीनामा, आता कोण घेणार जागा?

Kiran Mahanavar

PCB Zaka Ashraf : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चाललेला गोंधळ गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीनंतर अनेक बदल झाले, पण आता अखेर बोर्डाच्या वरच्या स्तरावर सर्वात मोठा बदल झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख म्हणजेच पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नजम सेठी यांना हटवल्यानंतर गेल्या वर्षी अश्रफ यांनी ही जबाबदारी स्वीकारली, पण त्यांच्या उपस्थितीनेही पाकिस्तानी संघाचे नशीब बदलू शकले नाही.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओच्या वृत्तानुसार, झका अश्रफ यांनी शुक्रवारी 19 जानेवारी रोजी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राजीनामा दिला. समितीच्या सदस्यांसमोर राजीनामा जाहीर करताना अश्रफ म्हणाले की, त्यांना पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या भल्यासाठी काम करायचे होते, पण अशा प्रकारे काम करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. ते कशावर प्रश्न उपस्थित करत आहेत, याचा उल्लेख अहवालात नाही.

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवले, तर कोचिंग स्टाफ आणि निवड समितीमध्येही बदल करण्यात आला. या सगळ्यात अश्रफ यांना केवळ त्यांची खुर्ची वाचवण्यात यश आले नाही तर पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वर उल हक कक्कर यांनीही त्यांना मुदतवाढ दिली.

मात्र आता खुद्द झका अश्रफ यांनी खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्याने पीसीबीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समधील आपली जागाही सोडली आहे. पुढचा प्रमुख कोण असेल हे केवळ पंतप्रधानच ठरवतील, असेही अश्रफ म्हणाले.

झका अश्रफ यांनी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी पीसीबी व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या आधी नजम सेठी हे जवळपास 6 महिने चेअरमन होते पण अचानक त्यांना हटवून अशरफ यांना चेअरमन करण्यात आले. अश्रफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी संघाची कामगिरी खराब राहिली.

आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतही संघ पोहोचू शकला नाही. त्याच वेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाला, तर न्यूझीलंडमध्येही सलग 4 टी-20 सामने गमावले. शुक्रवारीच चौथ्या टी-20 मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT