young boy esakal
लाइफस्टाइल

सेल्फी विकून 22 वर्षांचा मुलगा बनला करोडपती! वाचा यशोगाथा

सकाळ डिजिटल टीम

श्रीमंत व्हावे आणि घर, बंगला, कार असावी हे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यासाठी तो पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधतो. पण इथे आम्ही तुम्‍हाला एका अशा मुलाबद्दल सांगत आहोत जो केवळ सेल्फी विकून करोडपती झाला आहे. हा मुलगा फक्त 22 वर्षांचा असून त्याने सेल्फी विकून चक्क £733,500 (7 कोटींहून अधिक) कमावले आहेत. जाणून घ्या सविस्तर

इंडोनेशियातील या मुलाची यशोगाथा

इंडोनेशियातील या मुलाची यशोगाथा एका विदेशी मीडियाने प्रसिद्ध केली आहे. सुलतान गुस्ताफ अल घोजाली असे या २२ वर्षीय मुलाचे नाव असून तो कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करतो. या मुलाने वयाच्या 18 व्या वर्षी 1000 सेल्फी घेतले आहेत. चला जाणून घेऊया इंडोनेशियाचा सुलतान गुस्ताफ अल गोजाली याने इतक्या कमी वयात केवळ सेल्फीतून करोडोंची कमाई कशी केली?

कमी वयात केवळ सेल्फीतून करोडोंची कमाई?

22 वर्षीय सुलतान गुस्ताफ अल गोजालीने 'गोजाली एव्हरीडे' नावाचा व्हिडिओ प्रोजेक्ट बनवला आहे. लोकांना गंमत वाटेल या विचाराने त्याने हा व्हिडिओ बनवला आहे. तथापि, NFT (NFT: Non-Fungible Token) ने हा प्रकल्प आणि गोझालीची चित्रे विकत घेतली. NFT डिजिटल ही डिजिटल गोष्ट आहे आणि ती ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून खरेदी आणि विक्री केली जाते. असे म्हटले जाते की क्रिप्टोकरन्सी आणि NFTs स्पेशलाईल्ड प्लॅटफॉर्मवर खरेदी आणि विकल्या जातात

सेल्फी कोणी विकत घेईल, असे मला कधीच वाटले नव्हते

इंडोनेशियातील या मुलाची छायाचित्रे एनएफटी कलेक्टर्सनी विकत घेतली आहेत. गोझालीने आपला सेल्फी क्रिप्टोकरन्सीसाठी NFT लिलाव साइट OpenSea वर विकला. तो म्हणतो की, त्याचा सेल्फी कोणी विकत घेईल असे मला कधीच वाटले नव्हते. त्याने सांगितले की या सेल्फीची किंमत $3 ठेवण्यात आली आहे.

400 हून अधिक लोकांनी हे फोटो विकत घेतले

यानंतर एका सेलिब्रिटी शेफने हे सेल्फी विकत घेतले आणि सोशल मीडियावर प्रमोट केले, त्यानंतर 400 हून अधिक लोकांनी हे फोटो विकत घेतले. आता गोजलीने कोट्यवधी रुपये कमावले आहेत, मात्र त्यांनी याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली नाही. सुलतान गुस्ताफ अल गोजाली यांना ट्विटरवर ४० हजार लोक फॉलो करतात. या 22 वर्षीय विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी कर भरला होता

NFT म्हणजे काय आहे?

2014 मध्ये प्रथमच नॉन-फंगीबल टोकन (NFT) ने लोकांचे लक्ष वेधले. हा एक वेगळ्या प्रकारचा अपरिवर्तनीय डेटा आहे आणि तो वास्तविक जगात देखील उपलब्ध आहे. यामध्ये लोक क्रिप्टोकरन्सीचा वापर करतात. ओरिजीनल कॉपी डिजिटल आर्टला विकली किंवा खरेदी केली जाते. सर्व डिजिटल कलेचा स्वतःचा युनिक कोड असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT