Hair Fall  esakal
लाइफस्टाइल

Hair Fall : केस गळती रोखण्यासाठी ‘ही’ योगासने आहेत फायदेशीर

बिघडलेली जीवनशैली आणि पौष्टिक घटकांचा आहारात समावेश नसणे यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते.

सकाळ ऑनलाईन टीम

Yoga For Hair Fall Issues : केसगळतीची समस्या ही आता सर्वसामान्य झाली आहे. रोजचे धावपळीचे जीवन, वाढते प्रदूषण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही केसगळती होण्यामागची मुख्य कारणे आहेत. बिघडलेली जीवनशैली आणि पौष्टिक घटकांचा आहारात समावेश नसणे यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते.

केस कमजोर होणे, पातळ होणे आणि प्रचंड प्रमाणात केसगळती होणे या समस्या सध्या सर्व महिला वर्गाला भेडसावत आहेत. यावर मग अनेक उपाय केले जातात. मात्र, विविध प्रकारची योगासने केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत हे आपल्यातील बऱ्याच जणींना माहित ही नसेल.

आज आपण अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपली केसगळती तर थांबू शकते शिवाय आपल्या आरोग्याला ही याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.

१.शीर्षासन

शीर्षासन हे योगासन सर्व योगासनांमध्ये अतिशय फायदेशीर असलेले योगासन आहे. या योगासनाचा सराव केल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांची वाढ सुधारते. ज्या महिलांना केसगळतीची समस्या आहे, ज्यांचे केस पांढरे होत चालले आहेत, अशा महिलांनी हे योगसन नियमित करावे.

हे योगासन करण्यासाठी दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्या मग खाली वाकून डोके खाली ठेवा. त्यानंतर, दोन्ही पाय वरच्या बाजूला न्या. डोक्यावर उभे राहिल्यानंतर शरिराचे योग्य संतुलन राखा आणि सरळ व्हा.

२. त्रिकोणासन

त्रिकोणासन हे आसन फक्त केसांसाठी नाही तर आपला ताण-तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असे आहे. केस वारंवार पांढरे होत असतील, केस रूक्ष झाले असतील तर हे योगासन नियमितपणे करा. (Lifestyle)

हे योगासन करताना दोन्ही पाय काही अंतरावर ठेवून उभे रहा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात आणि खांदे सरळ रेषेत ठेवून ते वरच्या दिशेने करा. उजव्या बाजूला वाकून, उजव्या हाताने पायाला स्पर्श करा. आता तुमचा डावा हात आकाशाकडे वर करा आणि दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया पुन्हा करा.

३. उत्तानासन

उत्तानासन याचा रोज नियमितपणे सराव केला तर तुमच्या केसांच्या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. हे योगासन करण्यासाठी तुम्ही सरळ उभे रहा, आता एक दीर्क्ष श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या दिशेने न्या आणि श्वास सोडा. (Hair Fall) त्यानंतर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने खाली न्या आणि पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT