Diabetes Control Tips
Diabetes Control Tips 
लाइफस्टाइल

Diabetes Control Tips: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी 'हे' उपाय करा; 5 पाने पडतील उपयोगी

सकाळ डिजिटल टीम

Diabetes Control Tips: मधुमेहाचा त्रास होणाऱ्या अनेकांना आपल्या शरीराची आणि खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. शरीरातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून नेहमीच असे लोक सावध असतात.

यापैकी अनेकजण काही खाताना योग्य प्रमाणात खातात ज्यामुळे कोणतीही समस्या सुरु होऊ नये अन्यथा अनेकजण काही खाणे टाळतात. आजकाल कमी वयात मधुमेहाचा त्रास उद्भवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.

मधुमेहाचे प्रमाण वाढण्यापाठीमागे काही कारणेही आहेत. यातील पहिले कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव या असू शकतात. अशा परिस्थितीत लोक औषध खातातच असे नाही तर घरगुती उपायही करतात.

असे काही महत्वाचे उपाय आम्ही या लेखात सांगणार आहोत. यातील काही उपाय तुम्ही करु शकता. याद्वारे तुम्ही शरीरातील साखरेची पातळी कमी करू शकता. चला जाणून घेऊया त्या घरगुती उपायांबद्दल....

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय

  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळवेल हा सर्वात उत्तम पर्याय आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायद्याचे असणारे हायपरग्लायसेमिकचे गुणधर्म गुळवेलमध्ये आढळतात. आणि या पानांचा रस शरीरासाठी फायदेशीर असतो.

  • मोरिंगाची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिनचे काम करत असतात. यात अँटी-डायबेटिकचे गुणधर्म असतात. जे मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी असल्याचे सिद्ध होऊ शकते.

  • कडुलिंबाची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. हे शरीरासाठी फायदेशीर असल्याने अनेकवेळा डॉक्टरही त्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. कडुलिंब हायपोग्लायसेमिक आहे. अशा परिस्थितीत ही पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करतात.

  • आयुर्वेदातील अनेक आजारांच्या उपचारातही अश्वगंधा फायदेशीर आहे. अश्वगंधाची मुळे आणि पानेही या आजारासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे घरगुती उपायांसाठी तुम्ही याचा वापर करु शकता.

  • मधुमेहासाठी बऱ्याचवेळा घरगुती उपाय कामी येतात. असे उपाय केल्याने मधुमेह आटोक्यात राहतो असंही अनेकांचं म्हणण आहे. त्यामुळे बऱ्याचदा अशा घरगुती उपायांनी मधुमेह काही अंशी आटोक्यात राहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT