50 rupees google
लाइफस्टाइल

५० रुपयांची नोट बनवेल तुम्हाला लखपती; कसे ते पाहा...

एकदा तुम्ही आपली पर्स चाळून पाहा... कदाचित तुमचे लखपती बनण्याचे स्वप्न साकार होईल. ५० रुपयांच्या विशिष्ट प्रकारच्या नोटा बाजारात ३ लाख रुपयांना खरेदी केल्या जात आहेत.

नमिता धुरी

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात काही अशी संकेतस्थळे आहेत जी जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठ्या किंमतीत खरेदी करत आहेत. तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी साचवण्याचा छंद असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

एकदा तुम्ही आपली पर्स चाळून पाहा... कदाचित तुमचे लखपती बनण्याचे स्वप्न साकार होईल. तुमच्याकडे फक्त एक ५० रुपयांची जुनी नोट असणे आवश्यक आहे. ५० रुपयांच्या विशिष्ट प्रकारच्या नोटा बाजारात ३ लाख रुपयांना खरेदी केल्या जात आहेत.

तुमच्याकडे एखादी ५० रुपयांची नोट असेल तर त्यावर ७८६ हा क्रमांक आहे का तपासा. तशी संख्या असल्यास ही नोट तुम्ही ईबेवर ३ लाख रुपयांना विकू शकता. या मार्गाने यापूर्वीही अनेक लोक लखपती झाले आहेत. कदाचित यावेळी तुमचा नंबर असू शकेल.

मुस्लीम समाजात नियतीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या खूप आहे. दुसऱ्या बाजूला प्राचीन वस्तू जमा करणारेही भरपूर आहेत. मुस्लीम धर्मात ७८६ ही संख्या भाग्यवान मानली जाते. या संख्येच्या बाबतीत विविध धर्मतज्ज्ञांची विविध मते आहेत. मुस्लीमच नाहीत तर इतर समुदायांमध्येही या संख्येला महत्त्व आहे.

अशी करा विक्री

सर्वात आधी www.ebay.com या संकेतस्थळाला भेट द्या.

होमपेजवर विक्रेता म्हणून नोंदणी करा.

आपल्या नोटेचे व्यवस्थित छायाचित्र काढा आणि ते संकेतस्थळावर अपलोड करा.

तुमची जाहिरात ईबेवरील त्या लोकांना दिसेल ज्यांना जुन्या नोटा गोळा करण्याचा छंद आहे.

ज्यांना ही नोट खरेदी करायची असेल ते तुमच्याशी संपर्क साधतील.

त्यानंतर योग्य किंमत मिळाल्यास तुम्ही नोटेची विक्री करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT