friends sharing 
लाइफस्टाइल

नवरा-बायको 'या' 4 गोष्टी फक्त त्यांच्या मित्रमंडळांशी शेअर करतात, वाचून बसेल धक्का

या गोष्टी आपण आपल्या मित्रमंडळासोबत खूप सहजरित्या शेअर करु शकतो.

सकाळ डिजिटल टीम

या गोष्टी आपण आपल्या मित्रमंडळासोबत खूप सहजरित्या शेअर करु शकतो.

प्रत्येक व्यक्ती मग ती महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाचे आयुष्य लग्नापूर्वी वेगळे असते. या व्यक्तींचे लग्नानंतरचे अनुभवही वेगळे असतात. लग्नानंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण घरी किंवा घरातील सदस्यांना सांगू शकत नाही. परंतु अशा गोष्टी आपल्या मित्रमंडळासोबत सहजरित्या शेअर करु शकतो. अशा अनके गोष्टी ज्या मित्रांशी शेअर करताना कोणताही संकोच वाटत नाही. (after marriage four things couples share with his friends)

वैवाहिक आयुष्य लग्न केलेल्या नव्या जोडीच्या जीवनात अनेक बदल घडवून आणते. यामुळे तुमचे अनेक भ्रम दूर होतात. अनेक किस्से आणि प्रसंग तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करण्यासाठी तयार असता. तुमचा एखादा मित्र विवाहित असेल तर कदाचित तुम्हाला अशा गोष्टींची थोडी कल्पना असू शकते. अशाच काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या फक्त तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला त्यांच्या मित्रांशी शेअर करायच्या असतात.

लग्नाचा अनुभव मित्रांसोबत शेअर करताना..

एखाद्या मुलीच्या लग्नानंतर तिच्या मैत्रिणींच्या मनात एकच गोष्ट घोळत असते. ती म्हणजे आपल्या मैत्रिणीच्या सासूचा स्वभाव कसा आहे. बऱ्याचदा अनेक महिलांना लग्नानंतर हा प्रश्न सर्रास विचारला जातो. सासू-सासरे स्वभावाने कसे आहेत? तुझ्याशी कसे वागतात? असे अनेक प्रश्न विचारेल जातात. अनेकजण याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात. मात्र प्रत्येकवेळी सासू-सुनेची भांडणे होतातच असे नाही. अनेक मुली सासरच्या वातावरणाबद्दल आपल्या मैत्रिणींना सांगतात. घरच्यांना मात्र टेन्शन येवू नये यासाठी उघडपणे कोणतीच गोष्ट सांगित नाहीत. तसंच मुलंही बायको आली की मित्रांसोबत अनेक अनुभव शेअर करतात.

लग्नाचे पहिले वर्ष दिसते तसे नसते..

लग्नानंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्या इच्छा असूनही नवरा-बायको त्यांच्या घरच्यांना सांगू शकत नाहीत. अशा गोष्टी ते त्यांच्या मित्रमंडळींकडे शेअर करतात. यावेळी अशा गोष्टी ऐकून तुमते अविवाहित मित्र आश्चर्यचकित होतात. कारण तुम्ही त्यांना जीवनातील काही सत्यांची जाणीव करून देत असता.

वैवाहिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असते...

प्रत्येक नव्या किंवा जुन्या जोडीच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार हे असतात. अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला असेल. आपण सर्वांसाठी वेळ देऊ शकत नाही हे लग्नानंतर अनेकांना समजते. अशावेळी नवरा बायकोत खटके उडण्यास सुरवात होते. अनेकदा नवरा बायकोत झालेले वाद ते त्यांच्या मित्रांना सांगतात. मात्र कधी कधी ते भांडतात मात्र प्रेमाने भांडतात असंही ते मित्रांना सांगतात.

नात्यात स्पेस असणं आवश्यक..

लव्ह मॅरेज करणाऱ्या अनेकांना वाटते की लग्नानंतर ते कायमचं न भांडता एकत्र राहतील. मात्र, लग्न झाल्यावर एकमेकांना थोडी स्पेस देणं गरजेचं असतं. याबद्दल ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी नाही तर मित्रांशी बोलतात. लग्नानंतर आपल्या मित्रांसमोर अनेकजण सांगतात की त्यांना स्पेस हवी आहे. सतत एकमेकांसोबत न राहता काही काळ मित्रांसोबत आणि स्वतःसोबत घालवायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT