Amla Jam Recipe esakal
लाइफस्टाइल

Amla Jam Recipe : हिवाळ्यात मुलांना घरी बनवलेला आवळा जाम खायला द्या, होतील अनेक फायदे

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुलाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

Pooja Karande-Kadam

Amla Jam Recipe :

हिवाळ्याची सुरूवात आणि मुलं आजारी पडण्याची एकच वेळ असते. हिवाळ्यात लहान मुलेच नाहीतर मोठी माणसेही आजारी पडतात. या आजारांपासून दूर ठेवायचं म्हणजे त्यांना आपण घरात कोंडून ठेऊ शकत नाही. मुल खेळायला बाहेर पडतील. तेव्हा त्यांना साथीचे आजार होणारच.

त्यामुळे मुलांना या आजारांपासून वाचवण्यासाठी काही खास पदार्थ मदत करू शकतात. आज आपन मुलांसाठी पौष्टीक असलेल्या आवळा जामची रेसिपी पाहुयात.

आवळा व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु तरीही मुलांना खायला देणे थोडे कठीण होते. आवळा कच्चा खा म्हटलं तर मुलं नाक मुरडतात.

जर तुम्हाला हिवाळ्याच्या काळात मुलांना आजारापासून दूर ठेवायचे असेल. तर, तुम्ही त्यांच्या आहारात आवळा जामचा समावेश करू शकता. मुलांना जाम खायला आवडते, म्हणूनच ते आवळा जामही आवडीने खातात. न्यूट्रिशनिस्ट जसमीत कौर यांनी इंस्टाग्रामवर आवळा जाम बनवण्याची सोपी रेसिपी शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे.

आवळा जाम रेसिपी -

साहित्य -

  • आवळा गर - 1 कप

  • गूळ - 1 कप

  • हिरवी वेलची - 1

  • बडीशेप पावडर - 1 चिमूटभर

  • दालचिनी पावडर - 1 चिमूटभर

जाम बनवण्याची पद्धत -

  1. आवळा जाम बनवण्यासाठी प्रथम आवळे धुवून वाफवून घ्या.

  2. आता त्याचे बिया काढून चांगले मॅश करा.

  3. आवळा पेस्ट मंद आचेवर 5-10 मिनिटे शिजवा.

  4.  या पेस्टमध्ये 1 कप गूळ घाला आणि जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत ढवळत राहा.

  5. गूळ आणि आवळा एकजीव झाले की, मंद आचेवर 10 मिनिटे शिजू द्या.

  6. आता गॅस बंद करून त्यात हिरवी वेलची, बडीशेप पावडर आणि चिमूटभर दालचिनी पावडर घालून मिक्स करा.

  7. हा आवळा जाम तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता.

हिवाळ्यात मुलांसाठी आवळा जाम खाण्याचे फायदे

  • आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुलाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, त्यामुळे मूल आजारांपासून दूर राहते.

  • गूळ हा उष्णता आणि उर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे, जो हिवाळ्याच्या काळात आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यावरही हा जाम गुणकारी ठरतो. आवळ्याचे दाहक-विरोधी गुणधर्म श्वासोच्छवासाचे निरोगी आरोग्य राखण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात श्वसन रोगांचा धोका कमी होतो.

  • गूळ पचनास मदत करतो, हिवाळ्यात अति खाल्ल्याने किंवा जड पदार्थ खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या वाढतात. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते.

  • गूळ आणि आवळा हे लोहाचे चांगले स्त्रोत आहेत. जे हिवाळ्यात मुलांमध्ये रक्त वाढीस मदत करते आणि संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देते.

  • आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी निरोगी त्वचेला प्रोत्साहन देते. कोरड्या त्वचेच्या समस्या टाळते आणि त्वचा चमकदार बनवते.

  • आवळा मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु यापासून तयार केलेला जाम मुलांच्या आहारात मर्यादित प्रमाणात समाविष्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT