Anant-Radhika 2nd Pre Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Pre Wedding : अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट कोण आहे? ती किती शिकलीय माहितीय का?

Anant-Radhika 2nd Pre Wedding : मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा जुलैमध्ये पार पडणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Anant-Radhika Pre Wedding : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती अशी खास ओळख असलेल्या मुकेश अंबानीच्या कुटुंबात सध्या लग्नसराई सुरू आहे. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाहसोहळा जुलैमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी, या भावी वर-वधूची दुसरी प्री-वेडिंग पार्टी (Anant-Radhika 2nd Pre Wedding) परदेशात सुरू आहे.

सध्या अनंत-राधिका इटलीमध्ये त्यांच्या प्री-वेडिंगचा आनंद घेत आहेत. त्यांच्या प्री-वेडिंग पार्टीला बॉलिवूड अन् हॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी पहायला मिळतेय. हे प्री-वेडिंग एका अलिशान क्रूझवर सुरू असून इटलीनंतर पुढे फ्रान्समध्ये ही क्रूझ पार्टी रंगणार आहे.

राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार असून, सध्या तिच्याबद्ल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. ती नेमकी कोण आहे ? आणि तिचे शिक्षण किती आहे? याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट नेमकी कोण आहे? तिचे शिक्षण आणि संपत्ती किती? याबद्दल सांगणार आहोत.

राधिका मर्चंट कोण आहे?

राधिका मर्चंटचा जन्म १८ डिसेंबर १९९४ मध्ये मुंबईत मर्चंट कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव विरेन मर्चंट असे आहे तर आईचे नाव शैला मर्चंट असे आहे. विरेन मर्चंट हे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. भारतातील बड्या उद्योगपतींमध्ये त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आरोग्य सेवा कंपनी Encore चे ते सीईओ आहेत.

विशेष म्हणजे विरेन मर्चंट आणि मुकेश अंबानी हे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री असून आता ही मैत्री नात्यांमध्ये परिवर्तित होणार आहे. अनंत आणि राधिका हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. हे दोघे एकाच शाळेत शिकल्याचे सांगितले जाते. (Who is Radhika Merchant?)

राधिका मर्चंटचे शिक्षण किती?

राधिकाने मुंबईतल्या कॅथरॉल कॉन्वहेंट स्कूल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर, तिने Ecole Mondiale World School मधून आंतरराष्ट्रीय Baccalaureate चा डिप्लोमा केला.

त्यानंतर, २०१७ मध्ये राधिकाने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने देसाई अ‍ॅन्ड दिवानजी या Consulting फर्ममधून इंटर्नशीप पूर्ण करत तिच्या प्रोफेशनल करिअरला सुरूवात केली. राधिकाने एका रिअल इस्टेट कंपनीत ज्युनिअर सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.

राधिका सध्या तिच्या वडिलांच्या हेल्थ कोअर कंपनीमध्ये कार्यरत असून ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. तिने गुरू भावना ठक्कर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. विशेष म्हणजे २०२२ मध्ये जिओ वर्ल्ड सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तिने डान्स परफॉर्मन्स देखील सादर केला होता. तिच्या या नृत्याची बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. (What is the education of Radhika Merchant?)

राधिका मर्चंटची संपत्ती किती?

राधिकाच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक स्वावलंबी मुलगी असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती ही तब्बल ८०० कोटी आहे. सध्या राधिका मर्चंटकडे १० कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. (Radhika Merchant Net worth)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT