Tips for Parents to Manage Children's Use of Smart Speakers: जगभरातील मुले आज जवळजवळ दररोज आर्टिफिशल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करत आहेत. मुलांसाठी खास बनवलेली परस्परसंवादी खेळणी, गेम्स आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म हे सर्व एआयवर आधारित आहेत. एआय जितक्या झपाट्याने विकसित होत आहे, तितक्याच वेगाने तो मुलांच्या जगात खोलवर रुजत आहे. मात्र, बहुतेक देशांनी अजूनही एआयचा मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास केलेला नाही.
एआयचे फायदे समजून घेण्यासाठी आणि आपल्या मुलांना त्याच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. चालू असलेल्या संवादामुळे कुटुंबांना शाळा, आरोग्य सेवा , क्रीडा आणि कला संस्था तसेच इतर सामुदायिक संस्था एकत्र आल्या पाहिजेत. जेणेकरून आपण मुलांना एआयचा फायदा घेण्यास मदत करू शकू आणि त्याचे संभाव्य नुकसान कमी करू शकू.
लहान मुले एआय प्लॅटफॉर्मवर सहजपणे वैयक्तिक माहिती शेअर करतात. अनेक मुलांना वाटते की हे प्लॅटफॉर्म माणसांसारखेच विचार करतात, भावना व्यक्त करतात. ३ ते ६ वर्षांच्या वयोगटातील मुलांना स्मार्ट स्पीकर्समध्ये सामाजिक क्षमता असल्याचा समज आहे. काही वेळा, ते मानवांपेक्षा एआयवर अधिक विश्वास ठेवतात. किशोरवयीन मुलांचे चित्रही वेगळे नाही. ते दररोज विविध स्वरूपात एआय वापरत असले तरी, त्यांच्या पालकांपैकी फारच थोड्यांना याची माहिती असते की त्यांचे मूल नेमके काय वापरतंय, कशासाठी वापरत आहे.
पालकांनी मुलांशी एआयबद्दल बोलावे.
मोठ्या मुलांना ऑनलाइन गोपनीयता कशी व्यवस्थापित करायची ते शिकवा.
मुलांसोबत चॅटजीपीटी किंवा इतर अॅप वापरून पहा.
उत्सुकता आणि टीकात्मक विचारसरणीला प्रोत्साहन द्या.
एआय मुलांना शिकण्यास आणि वाढण्यास मदत करू शकते.
शिकण्यासाठी एक मौल्यवान साधन आहे.
सर्जनशीलतेला चालना देऊ शकते.
मुलांना नवीन मार्गांनी प्रेरित आणि गुंतवून ठेवू शकते
एआय म्हणजे केवळ यंत्रांचा वापर नाही, तर आपल्या मुलांच्या भविष्यातील विचारांची दिशा ठरवण्याचे माध्यम आहे. योग्य वापर केला, तर एआय त्यांच्या ज्ञानाला गती देऊ शकतो, सर्जनशीलतेला नवे पंख देऊ शकतो. पण तितकंच खरं म्हणजे, तंत्रज्ञानाच्या अतिरेकाने मुले आभासी जगात हरवू शकतात, भावनिकदृष्ट्या कमजोर होऊ शकतात.
- रजत वराडे, एआय तज्ज्ञ.