Kitchen Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : शिट्टी झाली की कुकरमधलं सगळं पाणी बाहेर येतंय? ट्राय करा मास्टरशेफ पंकजचा हा हॅक

काहीवेळा कुकर लावला असता, शिट्टी झाल्यावर त्या छिद्रांतून आतील पाणी फसफसून बाहेर पडते

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Tips : स्वयंपाक झटपट बनवण्यासाठी आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो. मिक्सर, फूड प्रोसेसर, इलेक्ट्रिक ब्लेंडर, फ्रायर, कुकर अशा भांड्यांचा वापर करुन चटकन स्वयंपाक करता येतो. प्रत्येक भांड्याला त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे स्वत:चे असे एक नाव असते.

Kitchen Tips : आपण रोजच्या वापरात कुकर, मिक्सर या उपकरणांचा वापर आवश्यकतेनुसार करतो. डाळ, भात किंवा इतर अन्नपदार्थ शिजविण्यासाठी आपण कुकरचा वापर करतो. कुकरमध्ये काहीही शिजवायला ठेवल तर फक्त ३ शिट्यांमध्ये तो पदार्थ शिजून तयार होतो.

यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे, काहीवेळा कुकर लावला असता, शिट्टी झाल्यावर त्या छिद्रांतून आतील पाणी फसफसून बाहेर पडते. असे झाल्यामुळे कुकर तर खराब होतोच, शिवाय हे पाणी सगळीकडे पडल्याने किचन देखील खराब होते.

नक्की काय आहेत उपाय? 

कुकरमध्ये, डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की, काहीवेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतोच. त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. असे होऊ नये म्हणून ३ सोपे पर्याय लक्षांत ठेवूयात. 

१. तेलाचा वापर : कुकरचे झाकण लावण्याआधी, कुकरच्या झाकणांवर जिथे आपण रबरी काळा गॅस्केट अडकवितो त्यांवर फूड ब्रशच्या मदतीने थोडेसे तेल लावून घ्या. कुकरच्या झाकणालाही आतल्या बाजूने जिथे शिट्टीचे नोझल असते त्या भागांवर फूड ब्रशच्या मदतीने थोडेसे तेल लावून घ्या. अस केल्याने कुकरमधील प्रेशरमुळे फसफसून बाहेर येणाऱ्या पाण्याला आळा बसतो. परिणामी, हे पाणी बाहेर येत नाही. 

२. स्टीलचा चमचा किंवा वाटी :- कुकरमध्ये डाळ किंवा इतर काही पदार्थ शिजत ठेवतांना त्यात एक स्टीलचा स्वच्छ धुतलेला चमचा किंवा वाटी ठेवावी. त्यानंतर कुकरचे झाकण बंद करुन घ्यावे. आता आपण नेहमीप्रमाणे जसा कुकर लावतो तसाच कुकर लावून घ्यावा. असे केल्याने कुकरच्या आतमधील पाणी शिट्टीच्या छिद्रांतून फसफसून बाहेर येत नाही.

३. टिश्यू पेपरचा वापर :- सर्वप्रथम कुकरची शिट्टी काढून घ्यावी. ज्या भागांत आपण शिट्टी अडकवतो त्या भागांत एक टिश्यू पेपर खोचून घ्यावा. टिश्यू पेपर लावल्यानंतर त्यावर रोजप्रमाणे शिट्टी लावून घ्यावी. आता हा कुकर नेहमीप्रमाणे गॅसवर ठेवून सुरु करावा. असे केल्यामुळे जरी शिट्टीच्या छिद्रांतून फसफसून पाणी बाहेर आलेच तरी टिश्यू पेपर ते जास्तीचे पाणी शोषून घेईल. यामुळे आपला कुकर खराब न होता तसाच्यातसाच स्वच्छ राहिल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT