Kitchen Tips : सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? 'या' टिप्स वापरा आणि लवकर आवरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitchen Tips

Kitchen Tips : सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? 'या' टिप्स वापरा आणि लवकर आवरा

Kitchen Hacks : सकाळची वेळ सगळ्यांसाठीच गडबडीची असते. त्यातही महिलांची अधिक घाई गडबड असते. कितीही लवकर उठून स्वयंपाक करायला घेतला तरी बरेचदा उशीर होतो. ऑफिस किंवा कॉलेजला जावं लागलं की हा त्रास आणखी वाढतो. सकाळी लवकर, टेस्टी आणि न थकता बनवणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत कामे पटापट आटपावी म्हणून आम्ही काही किचन टिप्स आणल्या आहेत.

हेही वाचा: Kitchen Astro Tips: स्वयंपाक घरातल्या ह्या गोष्टी कोणाला देत असाल तर सावधान, नाहीतर...

रात्री भाजी चिरून ठेवा

आदल्याच रात्री भाजी चिरुन फ्रीजमध्ये ठेवता येते. असे केल्याने तुमचा बराच वेळ वाचेल. विशेषत: तुम्ही अनेक पदार्थ बनवणार असाल तर हे काम नक्की करा.

हेही वाचा: Kitchen Hacks: 'अशी' करा सिलेंडर गॅसची बचत, बनवा या सोप्या उपायांनी गॅसवर जेवण

राजमा, हरभरा आणि डाळ भिजवून ठेवा

राजमा, हरभरा आणि डाळ अशा गोष्टी आहेत, ज्यांना शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून तुम्ही ते रात्रीच भिजवून ठेवावे. जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागेल. त्यांना भिजवल्याने पोषणमूल्ये वाढते. तसेच पटकन शिजते.

हेही वाचा: Kitchen Tricks: 'या' ट्रिकमुळे तुमचे किचनमधील किंचकट कामे सोपे होतील.

रात्री किचन आवरुन झोपा

जर तुम्ही रात्री किचन साफ ​​करून, आवरुन झोपलात तर सकाळी उठल्यावर तुमचा वेळ तर वाचेल शिवाय तुम्ही पॅनिक होणार नाही. यामुळे तुमची खूप मेहनत वाचेल आणि प्रत्येक सामान जागच्या जागी सापडेल.

हेही वाचा: Kitchen Tips: किचन मधील 'ही' पाच स्मार्ट उपकरणे जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात.

रात्री झोपताना काय बनवायचे याचा विचार

सकाळी उठून काय बनवायचे याचा विचार केला तर असा विचार करण्यात बराच वेळ वाया जाईल. त्यामुळे घरातील लोकांच्या आवडी-निवडींचा विचार करुन रात्रीच ठरवा की तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय बनवायचे आहे. यामुळे घरातील सदस्यांचा मूड आणि तुमचा वेळ दोन्ही वाचेल.

Web Title: Kitchen Hacks Tips Easy Tricks To Do Fast Cook And Work In Kitchen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kitchen Hacks