Ashadhi Wari 2024 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : रेल्वे रूळावर सापडलेल्या पताकांनी कोल्हापुरातील कदम कुटुंबाला भक्तीमार्गाला लावलं!

‘या पताका कुणाच्या आहेत काहीही माहिती नाही, पण गेली १३० वर्ष आम्ही त्या पताकांची वारी पूर्ण करतोय’

सकाळ डिजिटल टीम

 Ashadhi Wari 2024 :

पंढरीच्या वारीला सुरूवात झाली आहे. आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबाराय यांच्या पालख्या लवकरच पंढरपुरात पोहोचतील. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या  लवकरच पंढरपुरात पोहोचणार आहेत. वारीत सर्वच वारकऱ्यांच्या खांद्यावर भगव्या रंगाची पताका असते. ती खांद्यावर घेऊन ते पायी चालत असतात.

वारी केवळ एका मार्गाने चालणे नाही. तर, विठ्ठलाच्या नामघोषात केलेला तो एक सुखद प्रवास आहे. वारीत वारकरी परंपरागत चालत आलेली पताका खांद्यावर घेऊन वारी करतात. पंढरीत पोहोचल्यावर पताकांना चंद्रभागा नदीत पताकांना स्नान घालतात. आणि पुन्हा ती पताका आपल्या घरातल्या देव्हाऱ्यावर ठेवतात. (Ashadhi Wari 2024)

आज आम्ही तुम्हाला एका अशा कुटुंबाबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी वाटेत सापडलेल्या पताका सांभाळून १३० वर्षांपासून वारी करत आहेत.नक्की काय आहे ही गोष्ट आपण जाणून घेऊयात.

साधारण १२० वर्षांपासून कोल्हापुरातील लोहाळ मळा या भागात गिरजाई आणि शंकर कदम- तावडे यांच कुटुंब राहत आहे. शकंर कदम आणि गिरजाई यांची आता चौथी पिढी या गावात राहते. त्यापैकी अशोक कदम हे शंकर आणि गिरजाई यांचे नातू आहेत. ते या पताकांबद्दल सांगतात की, पुर्वीपासून आमच्या घरात वारीची परंपरा नव्हती.

म्हणजे शंकर यांचे वडील रावजी कदम हे उचगाव परिसरात वास्तव्यास होते. या गावाच्या आणि लोहार मळ्याच्या मधून एक रेल्वे रूळ गेला आहे. त्या रेल्वे रूळावर एक दिवस यांना ही पताका सापडली. त्यांनी ती घरी आणली आणि या पताका आमच्या घरातील देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या त्या कायमच्या.

अशोक यांचे पणजोबा रावजी कदम यांनी पताका घेऊन वारी केली. त्यानंतर पुढे सून गिरजाई आणि मुलगा शंकर यांनीही वारी सुरू ठेवली. ही वारी केवळ कदम कुटुंबियांइतकी मर्यादीत राहीली नाही. तर, त्याला दिंडीचेही स्वरूप आलेले. भागातील लोकांना एकत्र घेऊन गिरजाईंसोबत पायी दिंडी सोहळा पंढरपुरापर्यंत जायचा.

मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील राणादांचे वस्ताद म्हणून काम केलेले कलाकार मारूती माळी यांनीही या दिंडीच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, आम्ही लहान होतो तेव्हा मुडशिंगी,उचगाव भागातील दिंडी पंढरपुरला जायची. त्या वारीला गिरजा आज्जीसोबत अनेक लोक असायचे. लहानपणी मीही अनेकवेळा कदम कुटुंबियांसोबत ही वारी केली आहे.

गिरजाई-शंकर यांच्या मृत्यूपश्चात कदम घराण्यातील अनेकांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. गिरजाई आणि शंकर यांना पाच मुलं त्यांनीही वारी केली. आणि त्यानंतरच्या पिढीनेही या पताका दर आषाढी एकादशीला पंढरपुरात नेऊन न्हाऊ घालून आणल्या.

या पताकांबद्दल अशोक कदम म्हणतात की, या पताका कुणाच्या आहेत याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. पण, ज्याच्या असतील त्याचे नशिब किती थोर आहे की त्यांच्या घराण्यातील अनमोल ठेवा अचानक आमच्या जीवनात आला. या पताका आमच्या घरी असाव्या अन् त्यांची आम्ही मनोभावे पूजा करून वारी करावी ही श्री विठ्ठलाचीच इच्छा असेल.

या पताका घरी नेऊन आम्ही एक वारकरी जेवू घालतो. काही वर्ष आम्ही श्रावणात संत ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महारांचे ग्रंथ वाचले आहेत. भजन किर्तनही चालायचे घरी. या संपूर्ण सोहळ्यात माझे कुटुंबिय नेहमी उत्साहाने भाग घ्यायचे, असेही अशोक कदम यांनी सांगितले.

कोल्हापुरातील कदम कुटुंबियांना भागातील लोक तावडे म्हणूनही ओळखतात. कारण, कदम यांचे अडनाव उर्फ तावडे असेही होते. कदम कुटुंबियाचा उदरनिर्वाह अनेक वर्ष कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा तावडे हॉटेलवर चालत होता. पण काळाच्या ओघात हे हॉटेल मागे पडले अन् आता त्याचे नाव मात्र अजरामर झाले आहे. ही या भक्तीमार्गाचीच कृपा आहे असे कदम कुटुंबिय म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: पुण्याच्या जागेसाठी भाजप आक्रमक! विधान परिषद निवडणुकीसाठी नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी

Trump Declassifies Hidden UFO Files : आकाशातील गूढ की लष्करी गुपिते? ट्रम्प यांनी अखेर उघडला अतिगोपनीय यूएफओ फायलींचा खजिना!

Quick Indian Fusion Breakfast Idea: झटपट आणि चविष्ट बनणारा 'Smashed Aloo Tikki Tacos’ तुम्ही कधी ट्राय केलं का? लगेच रेसिपी लिहून घ्या

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

SCROLL FOR NEXT