Astro Tips esakal
लाइफस्टाइल

Astro Tips : भितीदायक स्वप्ने शांत झोपेचे १२ वाजवतात? या गोष्टींनी होईल भयानक स्वप्नांची सुट्टी

भितीदायक स्वप्न येण्याचे एक कारण म्हणजे मळलेले कपडे

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips :  

झोपेत स्वप्न पडणं ही सर्वांसाठीच सामान्य बाब आहे. लहानपणापासून आपल्या सगळ्यांनाच स्वप्न पडतात अन् त्याचे अनेक अर्थही काढले जातात. काही स्वप्न शुभ संकेत देतात. तर, काही स्वप्न आपल्याला पुढे घडणाऱ्या वाईट घटनेचे संकेतही स्वप्न देतात. लहानमुले आणि अतिविचार करणाऱ्या लोकांना भितीदायक स्वप्नही पडतात.

अनेक लहान मुले रात्रीच्यावेळी घाबरत उठतात. तर, मोठ्या व्यक्तींनाही सतत भितीदायक स्वप्नांचा सामना करावा लागतो. यामुळे झोपेचे १२ तर वाजतातच. पण त्याचबरोबर दिवसही खराब होतो. कारण भितीदायक स्वप्नांचा लोक दिवसभरही तोच विचार करत बसतात. (Astro Tips)

जर तुम्हालाही सत भितीदायक स्वप्न पडत असतील. तर सकाळी या स्वप्नांचा विचार करू नका. कारण, सतत अशी स्वप्न पडली तर मनात वाईट विचार घर करू लागतात. 

जर सतत अशी स्वप्ने पडत असतील तर काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे झोपायला जाण्याआधी मळलेले कपडे आपण बाजूला काढतो. तसेच दिवसभरातील अनेक विचार बाजूल करायला शिका. झोपेतही मनात विचार करणं बंद करा.  

हनुमान चालिसा

तणावामुळे भितीदायक स्वप्ने पडतात. त्यामुळे झोप लागत नाही. कोणत्याही प्रकारचे भयावह स्वप्न टाळण्यासाठी किंवा त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे.

चप्पल दूर काढणे

भितीदायक स्वप्नांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे झोपण्यापूर्वी चप्पल किंवा शूज बेडजवळ न काढणे. चपलांमुळे राहूचा अशुभ प्रभाव वाढतो. त्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

मोर पीसे ठेवा

भितीदायक स्वप्नांचा त्रास टाळण्यासाठी मोराची पिसे उशीखाली ठेवा. यामुळे मन शांत होते. काही काळ झोपण्याची जागा किंवा झोपण्याची दिशा बदलली पाहिजे.

मळलेले कपडे बदला

भितीदायक स्वप्न येण्याचे एक कारण म्हणजे तुम्ही बाहेर जाताना दिवसा जे कपडे घालता तेच मळलेले कपडे बदलले नाहीत. बाहेरून, कपड्यांसह नकारात्मक गोष्टी येतात. जे स्वप्नांना प्रोत्साहन देतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे तुमची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT