Bail Pola 2023
Bail Pola 2023  esakal
लाइफस्टाइल

Bail Pola 2023 : या पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी आमावस्या अपुरीच, तुम्ही कोणता पदार्थ बनवता?

Pooja Karande-Kadam

Bail Pola 2023 : गेल्या दोन महिन्यांपासून आपण सतत श्रावण, अधिक श्रावण ही नाव ऐकत आला आहात. श्रावण हा हिंदू धर्मियांचा पवित्र महिना मानला जातो. श्रावणात देवधर्म मोठ्या प्रमाणात केलं जातं. श्रावणात मासांहार टाळून लोक वेगवेगळ्या रानभाज्या, पालेभाज्यांचा आस्वाद घेतात.

अशा या श्रावणात अनेक सण समारंभही दणक्यात पार पडतात. श्रावणात अनेक उपवासही असतात.उपवास अन् सणांमुळे प्रत्येक घरात सात्विक अन् गोडाचा नैवेद्य असतो.

श्रावणातील आमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बैलाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याला पुरणपोळी, करंजी खायला दिली जाते.

पोळा हा दिवस आहे जेव्हा विशेषतः विदर्भातील शेतकरी बैलांची पूजा करतात. या शुभ दिवशी शेतकरी दिवस पूर्ण करण्यासाठी पुरणपोळी, करंजी, मिक्स भाजी असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ बनवतात.

श्रावणातील आमावस्येला काही पारंपरिक पदार्थ तुमचा श्रावण महिन्याचा शेवट गोड करतील. असे कोणते पदार्थ आहेत हे पाहुयात.

पुरण पोळी

आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरण पोळी बनवली जाते. हरभरा डाळीचे गोड पुरण कणकेच्या छोट्या गोळ्यात पातळ अशी गोड, मऊ अन् लुसलुशीत पोळी लाटली जाते. तूपाची धार सोडून खरपूस भाजली जाते.

श्रावणाच्या आमावस्येला विदर्भात बैलपोळा साजरा केला जातो. शेतकरी कुटुंबात बैलाला नैवेद्य म्हणून पुरण पोळी दिली जाते. या नैवेद्यात मिक्स भाजी, करंजी आणि पुरणपोळीचा मान असतो.

करंजी

मैद्याच्या घट्ट पिठाचे गोळे अन् त्यात भरलेलं खरपूस भाजलेल्या खोबऱ्याचं सारण याने करंजी बनते. करंजी लहान मुलांनाही आवडते.

मिक्स भाजी

श्रावणात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून जी डिश तयार होते, त्याला मिक्स भाजी म्हणतात. ही भाजी बनवताना सगळ्या शेंगा, वांगी, फ्लॉवर, चणे सगळे मिक्स करून त्याला कांदा-लसणाची फोडणी देतात. अन् त्याला ओले खोबऱ्याची अन् शेंगदाण्याचा बारीक मसाला वापरतात. या वेगळ्या मसाल्याने भाजी एकदम चवदार बनते.  

या खाद्यपदार्थावर औरंगाबादमधील खाद्यसंस्कृतीचा खूप प्रभाव आहे. ही भाजी भाकरी, चपाती,  भाताबरोबर खाल्ली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT