Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : तुम्हाला सतत लिपस्टिक लावयला आवडते? सावधान, होऊ शकतात गंभीर परिणाम

लिपस्टिक हे महिलांचे सर्वात आवडते कॉस्मेटिक असते. लिपस्टिक लावल्याने मेकअप लुकसोबतच चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.

सकाळ डिजिटल टीम

Side Effects of Lipsticks : मेकअप हा महिलांचा आवडता प्रकार आहे. घराबेहार पडताना किंवा सोशल मीडियावर वावरताना मेकअप करायलाच हवा असा जणू अलिखीत नियमच आहे. जर फूल मेकअप करायला वेळ नसला तरी लिपस्टिक तर लावतातच.

त्यामुळे लिपस्टिक हे महिलांचे सर्वात आवडते कॉस्मेटिक असते. लिपस्टिक लावल्याने मेकअप लुकसोबतच चेहऱ्याचे सौंदर्य वाढते, महिलांना लिपस्टिक लावणे आवडते.

लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकून राहण्यासाठी महिला वारंवार लिपस्टिक लावतात, याशिवाय काही लिपस्टिक दीर्घकाळ टिकतात. पण सतत लिपस्टिक लावल्याने किंवा दीर्घकाळ ठेवल्याने त्याचे अनेक दूष्परिणाम भोगावे लागतात, याची तुम्हाला कल्पना आहे का?

जाणून घ्या काय आहेत तोटे

लिपस्टिक ही केमिकलयुक्त असते, जी ओठांवर लावल्यानेही नुकसान होते, तुम्हीही जास्त लिपस्टिक लावत असाल तर सावधान.

लिपस्टिकमध्ये रसायने

लिड न्यूरोटॉक्सिन बहुतेक लिपस्टिकमध्ये असते, ओठांना रंग देण्यासाठी मँगनीज, शिसे, कॅडमियम सारखी रसायने वापरली जातात, जी ओठांना हानिकारक असतात.

ओठ काळे होणे

जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात आणि ओठ कोरडे पडतात, आपण सुद्धा बहुतेक लिपस्टिक ओठातूनच खातो.

पोट आणि मूत्रपिंडाचे नुकसान

लिपस्टिक ओठांमधून पोटात जाते, लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल पोट आणि किडनीला नुकसान पोहोचवते.

डोळ्यांची जळजळ

काही महिला आयशॅडो म्हणून लिपस्टिकचा वापर करतात, अशा परिस्थितीत डोळे जळण्याची आणि फाटण्याची समस्या उद्भवू शकते.

गरोदरपणात हानिकारक

गर्भवती महिलांनी लिपस्टिकपासून विशेष अंतर ठेवावे, लिपस्टिकमध्ये असलेले शिसे पोटात जाते, ज्याचा परिणाम न जन्मलेल्या बाळावर होतो.

संशोधन काय आहे

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, महिला लिपस्टिक लावतात, नंतर ती सेट करण्यासाठी अनेक वेळा लावतात, ज्यामुळे 87 मिलीग्राम लिपस्टिक पोटात जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT