Hair Oil Tips News Sakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips केसांना तेल कधी व कसे लावावे? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अगणित फायदे

Hair Oiling Tips केसांना तेल लावताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात; याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया..

सकाळ डिजिटल टीम

Lifestyle News : धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा तसेच केसांचे आरोग्य धोक्यात येते. त्वचा व केसांचे नुकसान होऊ नये, याकरिता योग्य पद्धतीने निगा राखणे गरजेचं आहे. केसगळतीचीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी केसांना तेल लावणंही तेवढंच गरजेचं आहे. 

त्याचबरोबर केसांना तेल लावण्याची पद्धत माहीत असेल तेव्हाच फायदे मिळतील. या लेखाच्या माध्यमातून आपण केसांना तेल लावण्याच्या योग्य पद्धतीचीही माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

केसांना तेल कधी लावावे?  

केसांना तेल कधी लावावे? याबाबत कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नाहीय. लोकांच्या समजुतीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय शॅम्पू करण्याच्या काही तास आधीही केसांना तेल लावणेही फायदेशीर मानले जाते. पण काही लोक केस धुतल्यानंतर तेल लावतात, पण ही सवय योग्य नाही कारण असे केल्याने केसांवर धूळ जमा होते.  

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत 

  • केसांवर तेल लावण्यापूर्वी तेल हलक्या स्वरुपात गरम करून घ्यावे

  • तेल थोडेसे थंड झाल्यानंतर बोटांच्या मदतीने तेल केसांना लावा व हलक्या स्वरुपात मसाज करा.

  • जवळपास १० ते १५ मिनिटे केसांचा मसाज करावा. 

  • केवळ स्कॅल्पलाच तेल लावू नये तर मुळांसकट संपूर्ण केसांना तेल लावावे. 

  • तेल लावताना टाळू कधीही रगडू नये. यामुळे केसांचे नुकसान होते. 

  • मसाज केल्यानंतर कोमट पाण्यात बुडवलेल्या टॉवेलनं केस १० मिनिटे बांधून ठेवा. 

  • यामुळे टाळूच्या त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात, ज्यामुळे त्वचा तेल शोधून घेते. 

  • यानंतर तासाभरानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

  • शक्य असल्यास आठवड्यातूम दोन ते तीन वेळा केसांना तेल लावावे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT