Saving Tips sakal
लाइफस्टाइल

Saving Tips : महिलांनो, 'या' सोप्या सेव्हींग टिप्स ट्राय करा, पैशाची चणचण कधीही भासणार नाही

महिलांसाठी काही सोप्या सेव्हिंग टिप्स जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Saving Tips : स्त्रिया या प्रत्येक बाबतीत स्मार्ट असतात मग ती बाब स्वयंपाक करण्याची असो, पतिला खुश करण्याची असो, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवण्याची असो की त्यांना उत्तम शिक्षण देण्याची असो. त्याचप्रमाणात पुरुषांच्या तुलनेत त्या अधिक चांगले सेव्हिंगही करतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी काही सोप्या सेव्हिंग टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया (best saving tips for women check list)

ऑनलाइन शॉपिंग करताना ऑफर वर वस्तू खरेदी करा

जेव्हा तुम्ही दिवाळी किंवा सणासुदीला ऑनलाईन वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला कमी पैशात उत्तम वस्तू मिळू शकतात. ऑनलाइन सेलचा फायदा घेऊन तुम्ही मोठी बचत सुद्धा करू शकता.

बजेट बनवा

बजेट बनवून ठरवा की या महिन्यात कोणत्या गोष्टींची खरेदी करायची आहे आणि कोणत्या गोष्टी विकत घेतल्या नाही तरी चालू शकते. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीनुसार छोटो छोटी बचतच भविष्यात मोठी पुंजी तयार करते.

रिचार्ज करताना डिस्काउंट ऑफर्सचा फायदा घ्या

रिचार्ज करताना डिस्काउंट ऑफर्सचा फायदा घ्या. टीव्ही आणि नेटचा वर्षभराचा रिचार्ज एकदाच करुन तुम्ही बचत करू शकता.

अनावश्यक शॉपिंग करणं टाळा

अनावश्यक गोष्टी खरेदी करू नका. कारण यामुळे तुम्ही तुमचे बजेट बिघडवत असता. जेव्हा खरेदी आवश्यक असते, तेव्हाच शॉपिंग करा आणि तिही चांगल्या लोकल मार्केटमधूनच.

पिगी बँक मध्ये पैसे टाका

पिगी बँकमध्ये शंभर दोनशे रुपये नेहमी टाकत रहा. अडी अडचणीच्या वेळी तुमची पिगी बँक तुमच्या मदतीला येऊ शकते.

बचत खातं उघडा

बचत खातं उघडून तुम्ही उत्तमपणे सेव्हींग करू शकता. एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्हाला बचत खातं कामी पडतं.

सरकारी योजना आणि आर्थिक स्कीम विषयी जाणून घ्या

अनेकदा आपल्याला सरकारी योजनेविषयी फारसं माहिती नसतं. त्यामुळे अनेकदा आपण सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. याशिवाय काही सेव्हींग स्किम्स किंवा फंड असतात याविषयी तुम्ही आर्थिक सल्लागार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT