Saree Fashion esakal
लाइफस्टाइल

Saree Fashion : साडीमध्ये एलिगंट लूक हवाय? मग, जान्हवी कपूरच्या 'या' लूक्सपासून घ्या प्रेरणा

Saree Fashion : आजकाल अनेक महिला कोणताही कार्यक्रम, लग्नसमारंभ किंवा पार्टी असो, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये साडी नेसण्याला प्राधान्य देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Saree Fashion : आजकाल अनेक महिला कोणताही कार्यक्रम, लग्नसमारंभ किंवा पार्टी असो, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये साडी नेसण्याला प्राधान्य देतात. साडी हा खर तर महिलांचा जीव की प्राण आहे असे, म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. साडी हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे.

काळानुसार साडीमध्ये अनेक प्रकार आता उपलब्ध झाले आहेत. विविध प्रकारच्या साड्या, फॅब्रिक्स, साडीवरील डिझाईन्स इत्यादी अनेक नानाविध प्रकार साडीमध्ये पहायला मिळतात. यासोबतच सेलिब्रिटींचे साडी लूक्स रिक्रिएट करण्यावर ही महिला भर देताना दिसत आहेत.

कमी कालावधीमध्ये ज्या अभिनेत्रींचे साडी लूक्स व्हायरल झाले आहेत, असे लूक्स खास करून तरूणी रिक्रिएट करताना दिसतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या काही साडी लूक्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे लूक्स तुम्ही ट्राय केले तर तुम्हाला साडीमध्ये एलिगंट लूक मिळू शकेल.

ब्लॅक साडी लूक

ब्लॅक साडीमधला लूक तर कमाल दिसतो, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा ब्लॅक साडीतला लूक खूपच अप्रतिम आहे. ब्लॅक साडी जर तुम्ही योग्य प्रकारे स्टाईल केली तर तुमचा लूक ही जान्हवी प्रमाणे क्लासी आणि एलिगंट दिसू शकेल, यात काही शंका नाही.

जान्हवीप्रमाणे तुम्ही सिक्विन्स डिझाईनचे लेस वर्क असलेल्या साडीवर हेव्ही सिक्विन्स वर्क असलेला ब्लाऊज कॅरी करू शकता. यामुळे, तुमचा लूक परिपूर्ण दिसेल. या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. जान्हवीप्रमाणे तुम्ही या साडीवर मिनिमल मेकअप, मोकळे केस, ब्लॅक आयमेकअप आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करून परफेक्ट एलिगंट लूक मिळवू शकता.

नेट साडी लूक

आजकाल मार्केटमध्ये नेट साड्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या नेट साड्यांमध्ये विविध प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींना देखील या नेट साड्यांनी भुरळ घातल्याचे दिसून येते. डेटवर जायचे असेल किंवा पार्टीला जायचे असेल तर नेट साडी परिधान करण्याला तरूणी प्राधान्य देतात.

अभिनेत्री जान्हवी कपूरने बेबी पिंक कलरची ही नेट साडी परिधान केली आहे. या नेट साडीवर मोत्यांचे सुंदर वर्क पहायला मिळत आहे. या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल.

या साडीवर तुम्ही मोत्यांची ज्वेलरी कॅरी करू शकता. तसेच, जान्हवीप्रमाणे मिनिमल मेकअप, हेअर बन आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करून तुमच्या लूकला चारचाँद लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

Latest Marathi News Live Update : 25000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT