border google
लाइफस्टाइल

TOURISM : सीमा सहलीद्वारे अनुभवता येणार बॉर्डरवरील जवानांचे जीवन

सीमाभागातील गावकऱ्यांचे आयुष्य कसे असते, तेथील लष्करी जवानांचे काम कसे चालते, इत्यादी माहिती या सहलीमध्ये पर्यटकांना मिळणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी सीमाभागातील दऱ्याखोऱ्यांत तैनात असलेल्या भारतीय लष्कराचे जीवनमान कसे असेल, सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य कसे असेल याचे सामान्यजनांना नेहमीच कुतूहल असते. हे कुतूहल शमवण्याची संधी लवकरच मिळणार आहे. जम्मू-काश्मीर येथील स्थानिक तरुणांनी सीमा सहलीचे (border tourism) आयोजन केले आहे. यासाठी पुण्याच्या सरहद संस्थेने त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

सीमाभागातील गावकऱ्यांचे आयुष्य कसे असते, तेथील लष्करी जवानांचे काम कसे चालते, इत्यादी माहिती या सहलीमध्ये पर्यटकांना मिळणार आहे. काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील दर्दपोरा गावातील अनाथ आणि अल्प उत्पन्न गटातील तरूण या सहलीचे आयोजन करणार आहेत. या तरुणांना समाजासाठी काहीतरी करायचे होते. म्हणून त्यांनी सीमा सहल सुरू केली. याअंतर्गत पर्यटकांना सीमेवर नेले जाईल. तेथील नागरिक कसे आयुष्य जगतात याची माहिती दिली जाईल, असे 'सरहद'चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले.

या सहली दरम्यान सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानांना भेटण्याची संधीही पर्यटकांना मिळणार आहे. यामुळे सीमेवरील गावांमध्ये पर्यटन शक्य असल्याची जाणीव समाजात निर्माण होऊ शकते आणि या भागातील नागरिक कसे आयुष्य जगतात याची माहिती पर्यटकांना मिळू शकते.

या सहलीमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळू शकेल. तसेच या निमित्ताने विविध राज्यांतील पर्यटक एकमेकांशी जोडले जातील. यासोबतच पर्यटकांना काश्मीरचे सौंदर्य न्याहाळण्याची संधीही मिळेल. या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क - ०२०२४३६८६२१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT