bride doing office work on her wedding day hilarious viral video
bride doing office work on her wedding day hilarious viral video  esakal
लाइफस्टाइल

लग्नाच्या दिवशीही नवरी करतेय ऑफिसचे काम, म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा

काहीजण घरून ऑफिसची कामे करत आहे. एकीकडे लोक घरून काम करून कोरोनापासून सुरक्षित आहेत, तर दुसरीकडे वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) लोक प्रचंड नाराज झाले आहेत.

वाढत्या कोरोनामुळे (Corona) काहींचे ऑफिसला जाणे पुन्हा एकदा बंद झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनापासून (Corona) दिलासा मिळाल्यानंतर लोकांनी ऑफिसमध्ये (Office) जाण्यास सुरुवात केली होती, मात्र पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सरकारने घरून काम सुरू करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीत काहीजण घरून ऑफिसची कामे करत आहे. एकीकडे लोक घरून काम करून कोरोनापासून सुरक्षित आहेत, तर दुसरीकडे वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) लोक प्रचंड नाराज झाले आहेत. कारण जेव्हा तुम्ही घरून काम करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कामातून कधीच ब्रेक मिळत नाही. तुमचे वरिष्ठ तुम्हाला नेहमी कामात व्यस्त ठेवतात. त्यामुळे आता प्रत्येकजण या वर्क फ्रॉम होममुळे हैराण झाला आहे.

एका नववधूचा (Bride) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती लॅपटॉप (Laptop) घेऊन बसलेली दिसतेय आणि लग्नाच्या दिवशीही ऑफिसचे काम करतीय. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की नववधू तयार होत आहे ती लॅपटॉप घेऊन बसली आणि फोनवर तिच्या वरिष्ठांशी कामाबद्दल बोलतीय. ती देखील खूप अस्वस्थ दिसते. पुढे तुम्हाला दिसेल की नववधू लग्नासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि तरीही ती लॅपटॉप घेऊन तिच्या वरिष्ठांशी कामाबद्दल बोलत आहे आणि सर आज माझे लग्न आहे, आज मी हे काम करू शकणार नाही असे नाराज होऊन सांगताना दिसतेय.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजले असेलच की वर्क फ्रॉम होममुळे लोकांचे काय हाल झाले आहेत आणि लोक कसे नाराज झाले आहेत. वर्क फ्रॉम होममुळे लोकांना कमी सुट्ट्या मिळत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले, मला भीती वाटतेय की माझ्या लग्नात माझ्यासोबत असेच घडू नये. यावेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, बिचारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : अर्धशतक करणारा तिलक वर्मा रनआऊट, सामना रोमांचक वळणावर

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT