Buddha Purnima 2024 esakal
लाइफस्टाइल

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला घरी आणा बुद्धांची अशी मूर्ती, घरात नांदेल सुख-शांती

गौतम बुद्धांची मूर्ती घरात का असावी?

सकाळ डिजिटल टीम

Buddha Purnima 2024 :

देशभरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. कारण, या दिवशी म्हणजेच वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. केवळ जन्मच नाहीतर, याच पौर्णिमेदिवशी त्यांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि त्यांचे निर्वाणही झाले होते. त्यामुळेच या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

गौतम बुद्धांनी नेहमी सत्य आणि अहिंसेचा प्रसार केला आहे. त्यामुळेच सर्वच क्षेत्रात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. तसेच, वास्तू शास्त्रातही त्यांच्या मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तू शास्त्र आणि फेंगशुईमध्येही याचे तपशीलवार वर्णन केले आहे.

जर तुम्हाला तुमच्या घरात एक सुंदर बुद्ध मूर्ती आणायची असेल, जेणेकरून घरातील वातावरण शांत राहावे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी असाल, तर तुम्ही बुद्ध मूर्तीतील पाण्याचा कारंजा घरी आणू शकता. हा कारंजा घरी ठेवल्याने अनेक फायदे होतात.

तणाव कमी होतो

बुद्धांच्या या कारंज्यामुळे शरीरावर,मनावर आणि घरातील वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्या पाण्याच्या आवाजाचा शरीरावर शांत प्रभाव पडतो. घरातील वातावरण तणावाचे असेल तर या कारंजा तुम्हाला सुखदायक अनुभव देईल. (Buddha Purnima 2024)

सुंदर आणि आकर्षक बनतं घर

बुद्धांच्या मूर्तीतील पाण्याचा कारंजे एक सुंदर आणि मोहक सजावटीचा भाग आहे. हा कारंजा सौंदर्य आणि शांततेचा स्पर्श घराला देऊ शकतात. ही मूर्ती केवळ घरातील कुटुंबियांनाच नाहीतर बाहेरून घरात आलेल्या प्रत्येकाला शांत करू शकते.

सकारात्मकता वाढते 

फेंगशुई शास्त्रामध्ये पाणी हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात बुद्धांचा पाण्याचा कारंजा ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास मदत होते. कुटुंबातील कलह संपून सुसंवाद वाढतो. हे घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व भागात ठेवावे. कारण हा कारंजा करियर आणि पैशाशी संबंधित आहेत.

ध्यानासाठी सर्वोत्कृष्ठ

ज्या लोकांना ध्यान करण्याची सवय आहे. त्यांनी घरात बुद्धांचा कारंजा ठेवावा. कारण, या पाण्याचा खळखळ आवाज तुमच्या बैचेन मनाला स्थिर करू शकतो. ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो. ध्यान करणाऱ्या प्रत्येकालाच हा पाण्याचा आवाज आणि वातावरण मनाला स्पर्श करणारे भासते.  

गौतम बुद्धांची मूर्ती घरात का असावी?

गौतम बुद्ध हे शांतता आणि सत्याच्या मार्गावर चालणारे होते. त्यांनी आयुष्यभर या गोष्टींचा प्रसार केला. ते कधीही असत्याने वागले नाहीत. अशा या महात्म्याची मूर्ती आपल्या घरात असणे शूभ मानले जाते. त्यामुळेच घरात लाफिंग बुद्धा, बुद्धांच्या विविध आकारातील मूर्ती,बुद्ध कारंजा ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT