लाइफस्टाइल

चंदनपुरी...जिथे बानुच्या सौंदर्याला भुलला खंडोबाराया! | चंपाषष्ठी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : चंपाषष्ठी (champashashthi) म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठ ही तिथी... मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

महाराष्ट्रात दुस-या क्रमाकांचे खंडोबाचे देवस्थान

मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले जाते. चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. महाराष्ट्रात दुस-या क्रमाकांचे देवस्थान आहे. चंपाषष्ठीला दरवर्षी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. तसेच जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेत लाखो भाविक महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.

चंपाषष्ठीची कथा
यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते.


बानुबयांचं गाव...चंदनपुरी
खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईच्या सौदर्याला भूलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाईच्या घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्यावर चाकरी केली होती व लग्न लावून जेजुरीस आणले असे सांगितले जाते. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तीच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी...

वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य

या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्या मधील मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण नाशिक-मालेगाव मार्गावर मालेगावचे अलीकडे चंदनपुरी फाट्या पासून ३ किमी अंतरावर आहे. गिरणा नदी काठी असलेल्या या गावातील गाडी रस्त्याने मंदिरा पर्यंत जाता येते. मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. मंदिराचे पुर्वद्वार प्रमुख असून या द्वारा बाहेर दीपमाळ पायारीमार्ग व मार्गाचे बाजूने चोथरे आहेत.पूर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वभिमुख मुख्य मंदिर दिसते. मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपात जाण्यासाठी पूर्व द्वारास काही पायऱ्या आहेत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगतात.

पूर्वभिमुख गर्भगृहात एका पूर्वभिमुख कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मुर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात या पूर्वीच्या मुर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या. या मुर्ती समोर शिवलिंग आहे. मुख्य मंदिराच्या मागे कोटाचे पश्चिम दरवाज्याचे दक्षिण बाजूस एका कोनाड्यात शेंदूर चर्चित स्थान आहे. मंदिराच्या उत्तर बाजुस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहे. चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाईचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मुर्ती संगमरवरी आहे, पौष पौर्णिमेस मोठी यात्रा भरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT