Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti : पैसे कमवताय पण अधिक धनलाभासाठी चाणक्याच्या 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या!

तुम्हाला आयुष्यात अधिक धनलाभ हवा असेल तर चाणाक्याच्या या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

सकाळ ऑनलाईन टीम

Chanakya Niti : चाणाक्यनितीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला आयुष्यात अधिक धनलाभ हवा असेल तर चाणाक्याच्या या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.

या गोष्टी लक्षात घ्या

1) जर तुम्ही आर्थिकदृष्टा सक्षम असेल तर पैसे वाचवण्याऐवजी जमीन, सोने इत्यादींमध्ये गुंतवणुक करा. ही गुंतवणूक वेळ आल्यावर तुम्हाला मोठा नफा देईल.

2) जर तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल तर तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका. चाणक्यच्या मते, जे लोक अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतात, त्यांना भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

3) कल्याणकारी कामात पैसा खर्च करावा. तसेच गरीब आणि आजारी लोकांना मदत करा. याशिवाय मंदिर किंवा धार्मिक स्थळी दान करा. यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि देवाची कृपा प्राप्त होते.

4) चाणक्य नुसार जर तुमच्याकडे पैशाची कमतरता नसेल तर त्याचा उपयोग सामाजिक कार्यात करावा. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांनी दवाखाना, शाळा इत्यादीची सोय करून देण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुमचा आदर वाढतो आणि तुम्हाला लोकांचे आशीर्वादही मिळतात.

चाणाक्य नितीमध्ये सामान्य जीवनाशी निगडीत बरेच उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय करत तुम्ही तुमचे जीवन सुरळीत करू शकता. तसेच जीवनाचा मूलमंत्र तुम्ही चाणाक्य नितीतून घेऊ शकता.

आचार्य चाणक्य हे असे महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकली. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले.

इतकी शतके उलटून गेल्यावरही, चाणक्याने सांगितलेली तत्त्वे आणि धोरणे जर समर्पक असतील, तर ते केवळ मानवी कल्याणाच्या उद्देशाने आपल्या सखोल अभ्यास, चिंतन आणि जीवनानुभवातून मिळालेले अमूल्य ज्ञान त्यांनी नि:स्वार्थपणे व्यक्त केले. (Chanakya Niti)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

SCROLL FOR NEXT