Chinese Dosa esakal
लाइफस्टाइल

Chinese Dosa : घावणं, उत्तपा, आंबोळी करून वैतागला असाल तर बनवा चायनिज डोसा, रेसिपी सोपी अन् चवही झकास

साध्या डोश्यांना चायनिज तडका द्यायला विसरू नका

सकाळ डिजिटल टीम

Chinese Dosa :  रविवार किंवा एखाद्या स्पेशल दिवशी घरात आंबोळीची तयारी केली जाते. पीठ एकच असतं पण त्याचे प्रकार अनेक केले जातात. आंबोळी, घावणं, डोसा, आप्पे, इडली असे अनेक प्रकार या मिश्र डाळी आणि तांदुळापासून बनतात. पुर्वापार चालत आलेले हे पदार्थ आपल्या घरात सहज रूळले आहेत.

तुम्हीही घरात डोश्याचा बेत केला असेल. तर साध्या डोश्यांना चायनिज तडका द्यायला विसरू नका. मुलांना चायनिज पदार्थ आवडतात. त्यामुळेच, चायनिज डोसा कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहणार आहोत.

साहीत्य -

डोशाचे तयार पीठ, पाव किलो घट्ट कोवळा पानकोबी, २-३ गाजरे, १ भो. मिरची, १ कांदा, अर्धी वाटी मोडाचे मूग, १ टी स्पून तेल, चवीनुसार मीठ, मिरपूड

कृती :

पानकोबी वेफर्सच्या किसणीवर किसून घ्यावा. गाजर सोलून किसून घ्यावे भोपळी मिरची, कांदा पातळ, बारीक चिरावा.

१ टी स्पून तेलाची फोडणी करून त्यात कांदा, किसलेला कोबी, गाजर, भोपळी मिरची, मोडाचे मूग व चवीनुसार मीठ, मिरपूड घालून मोठ्या गॅसवर भरभर परतून घ्यावे, जास्त शिजवायचे नाही. हा डोशाचा मसाला झाला.

डोशाच्या कृतीत लिहिल्याप्रमाणे डोशाचा तवा तयार करून घ्यावा. डावाने पीठ घालून तवाभर पातळ डोसा घालावा. पाव टी स्पून तेल सोडून डोसा तव्यावरून सोडवून घ्यावा डोशाच्या मधोमध वरती तयार केलेला मसाला घालून डोशाची गुंडाळी करावी.

डोशाची गुंडाळी प्लेटमध्ये काढून त्याला ३-४ तिरके कट द्यावेत म्हणजे स्प्रिंग रोल सारखे छोटे पीस होतील व खायला सोईचे होईल. (Recipe)

महत्त्वाची टीप :

 डोशांचे वरचे कुरकुरीत कव्हर असते त्यामुळे आत सारण भरले की खूप छान लागते. पुन्हा स्प्रिंगरोलसारखे तळलेले नसल्याने सर्वांना खायला, न्याहरीला, स्नॅक्सला उत्तम प्रकार आहे.

भाज्या कच्च्या वापरायला हरकत नाही. पण थोड्या परतून घेतल्याने चांगल्या लागतात, ओलसर होतात, त्यामुळे डोशाला कट दिले तरी मसाला बाहेर येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

Samruddhi Mahamarg Car Fire : समृद्धी महामार्गावर धावती इलेक्ट्रिक टाटा नेक्साॅन कार अचानक पेटली; कारमधून बाहेर पडताच..., पाहा नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT