लाइफस्टाइल

दिवाळी आणि मोती साबण हे नातं घट्ट कसं झालं?

दिपाली सुसर

'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, दिवाळी आली आणि या वाक्याची आठवण झाली नाही, असं कधी होत नाही. दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य भाग म्हणजे मोती साबन. (Moti Soap) या साबणाची गोष्ट सुद्धा 'तिमिरातूनी तेजाकडे' अशीच आहे.

दिवाळी (Diwali) आणि मोती साबण(Moti Soap) हे एक समीकरणच आहे. सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने(Tata Oil Mills)मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. गुलाब(Rose), चंदन(Sandle) सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच शाही थाट दाखवला. या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. (Connection between Diwali and Moti Soap)

मला चांगलं आठवतं, माझ्या लहानपणी आई मला दिवाळीच्या सामानाची यादी करायला लावायची तेव्हा माझे छोटे बहिण-भाऊ आवर्जून मोती साबण लिहायला सांगायचे. काही वर्षांपूर्वी टिव्हीवर आलेल्या ‘अलार्म काकां’च्या जाहिरातीमुळे मोती साबणाबद्दल लोकांच्या मनात एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. दिवाळी आहे आणि नरकचतुर्दशीचे ‘अभ्यंग स्नान’ करतांना मोती साबण नाहीये असं फार कमी मराठी घरात होत असावं. मोत्यांसारखा गोलाकार असा हा साबण सगळ्यांसाठीच फार विशेष आहे.

१९९३ मध्ये टाटा ऑईल मिल्स ही तत्कालीन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये समाविष्ट झाली. मोती साबणाला त्यावेळी २५ रुपयांच्या किमतीमुळे 'प्रीमियम साबण' म्हणून समजलं जायचं. मोतीचा साबणाचा आकार, चंदनाचा फ्लेवर या गोष्टी मोती साबणाचे आकर्षित करणारे खास बिंदू ठरले आहेत.

मोती साबणाची क्रेझ महाराष्ट्रच नाही तर, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही आहे. या राज्यांच्या काही भागात अभ्यंग स्नानाला खूप महत्व आहे. त्यामुळे या तीन राज्यात मोती साबणाला जास्त मागणी आहे. दिवाळीसोबतच इतर धार्मिक विधींच्या वेळी सुद्धा मोती साबण वापरला जावा यासाठी कंपनीने बरेच प्रयत्न केले. २०१३ मध्ये काही ठराविक राज्यात मोती साबणाचा खप वाढवण्यासाठी कंपनीने एक कॅम्पेन सुद्धा चालवलं होतं.

एक काळ असा होता, जेव्हा कितीही हलाखीची परिस्थिती असली, तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेतांना विचार करायची नाही. दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा.

सुरुवातीला ज्या जाहिरातींमधून मोती साबणाला लोकांपर्यंत आणलं गेलं, त्यात साबण मोत्यांच्या कोंदणात ठेवलेला असायचा. लोकांना ही कल्पनासुद्धा खूप नाविन्यपूर्ण वाटली होती. पण, मोती साबणाची आठवण ही दिवाळीतच का येते? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे.तर अभ्यंग स्नान हे उटण्याशिवाय केलं जात नाही. उटणे ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे. अभ्यंग स्नान करतांना आधी उटणे लावले जाते.

९०च्या दशकांत बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोतीला तग धरण्यासाठी कंपनीने ‘उटण्या’चा फ्लेवर असलेला साबण, अशी जाहिरात केली. दिवाळीचा दिवा लावतांना बाजूला असलेल्या मोती साबणामुळे अशी प्रतिमा लोकांच्या मनात नकळत तयार झाली, की मोती साबण हा खास दिवाळीसाठीच तयार करण्यात आला आहे. ९० च्या दशकातील प्रत्येकजण हा मोती साबणाकडे एक बालपणीची आठवण म्हणूनच बघतो आणि विकतही घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT