Cracked heels, use glycerin and honey to get soft and shiny feet
Cracked heels, use glycerin and honey to get soft and shiny feet  Esakal
लाइफस्टाइल

पायाच्या टाचांना भेगा पडल्या आहेत,ग्लिसरीन आणि मधाचा वापर करून मिळवा, मऊ लुसलुशीत पाय

सकाळ डिजिटल टीम

पायाच्या टाचांना भेगा पडणे हे असंख्य महिलांच कायम स्वरुपीचं दुखणं असतं. ऋतू कोणताही असो नेहमी पायाच्या टाचांना भेगा पडतातच.

टाचांच्या भेगांमुळे पायाचं सौंदर्य तर बिघडतंच शिवाय भेगांमुळे टाचा सतत दुखत असल्यानं लक्षही विचलीत होतं. तुमच्या या पायांच्या भेगांवर पेडिक्यूअर, मेडिकलमधले मलमं उपयोगी पडत नसतील तर हा आज आम्ही सांगणारा हा घरगुती उपाय करुन पाहा.

चला तर मग पायांच्या भेगांपासुन सुटकारा मिळण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत याविषयीची सविस्तर माहिती...

मध, ग्लिसरीन, गरम पाणी आणि माॅश्चरायझर यांचा वापर करुन तुम्ही तुमच्या पायाच्या भेगा सहज घालवू शकता. हा उपाय केला तर तुमचे खरबरीत पाय आपोआप लोण्यासारखे मऊसर करणं सहज शक्य आहे.

टाचांच्या भेगांवर ग्लिसरीन लावणे हा चांगला उपाय आहे. ग्लिसरीनमुळे टाचांच्या त्वचेला आर्द्रता मिळते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीत ग्लिसरीन घ्यावं. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चांगलं एकजीव करुन ते टाचांच्या भेगांना लावावं . असे केल्याने पायाच्या भेगा मऊ पडतात, तसेच भेगांमधील घातक जिवाणू मरायला मदत होते. हा उपाय नियमित केल्यास भेगा आपोआप बऱ्या होतात.

आता बघू या टाचांच्या भेगा भरुन येण्यासाठी मधाचा देखील तुम्ही उपयोग करु शकता. यासाठी रोज रात्री झोपण्याआधी मध, दूध आणि संत्र्याचा रस यांचं मिश्रण करुन तो भेगांना लावावा. यामुळे भेगा मऊ पडून बऱ्या होण्यास मदत होते.

माॅश्चरायझरचा उपयोग करावा. त्वचेतील आर्द्रता लुप्त झाल्यानं टाचांना भेगा पडतात. टाचा मऊ राहण्यासाठी, भेगा पडू नये म्हणून आणि भेगा असल्या तर त्या जाण्यासाठी, त्या स्वच्छ करण्यासाठी माॅश्चरायझरचा उपयोग होतो. रोज रात्री टाचांना माॅश्चरायझर लावल्यानं भेगा लवकर भरतात

टाचांना भेगा पडल्यावर केवळ त्वचा खडबडीत होत नाही तर टाचांमधून जंतूसंसर्ग होण्याचा धोकाही असतो. टाचा दुखतात. भेगा मऊ पडून दुखण्यावर आराम पडण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी पायांना सोसवेल एवढं पाणी गरम करावं. पाण्यात थोडं मीठ घालावं. या पाण्यानं पाय नीट धुवावे. मीठ घातलेल्या गरम पाण्यानं पाय धुतल्यानं भेगांमध्ये अडकलेली घाण निघून जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT