Curry Leaves For Hair
Curry Leaves For Hair esakal
लाइफस्टाइल

Curry Leaves For Hair : केसांवर सतत केमिकल लावण्यापेक्षा एकदा कडिपत्त्याचा मास्क लावून बघाच!

Pooja Karande-Kadam

 Curry Leaves For Hair : कढीपत्त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. केसांच्या अनेक समस्या दूर होतात. केसांसाठी अनेक प्रकारे त्याचा वापर करता येतो. यामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात आणि त्यांना अगदी सहजपणे निरोगी बनवतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे.

कढीपत्त्यात असे अनेक पोषक तत्व असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, प्रथिने इत्यादी पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे केसांच्या निर्मितीस सहज मदत होते आणि स्कॅल्पचे रक्ताभीसरण सुधारते, ज्यामुळे ते निरोगी राहण्यास मदत होते. (Hair Care Tips)

यामुळे केसांचा पूर्ण विकास होतो आणि केसांच्या वाढीसाठीही हे खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया केस निरोगी ठेवण्यासाठी आणि वाढ वाढवण्यासाठी तुम्ही याचा कसा वापर करू शकता.

हेअर मास्क

एक ते दोन चमचे दह्यात मूठभर कढीपत्ता मिसळून पेस्ट तयार करा. आपण आपल्या केसांनुसार त्याचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. आता ही पेस्ट केसांमध्ये चांगली लावा आणि टाळूवरही लावा. अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवून घ्यावेत. आठवड्यातून दोन दिवस लावल्यास केस मुलायम आणि निरोगी होतील.

आहारात याचा समावेश करा

आहारात याचा समावेश केल्यास मुळं अधिक निरोगी आणि मजबूत होतील. यासाठी तुम्ही त्याची पावडर तांदूळ किंवा कढीमध्ये वापरू शकता. हवं असेल तर ताक, चटणी वगैरेमध्ये घालून आहारात त्याचा समावेश करू शकता. कढीपत्त्याचा वापर तुम्ही इतर ही अनेक प्रकारे करू शकता. कढीपत्त्याचा आहारात किंवा केसांच्या काळजीत समावेश केल्यास टाळूच्या रक्तवाहिन्या सुधारतील, कोरड्या केसांची समस्या दूर होईल, कोंडा होणार नाही, केस काळे होतील आणि इतर अनेक समस्या सहज दूर होतील.

हेअर पॅक

केसांची वाढ होण्यासाठी, ताज्या कढीपत्त्यासह मेथी आणि आवळा यांचा हेअर पॅक वापरा. यासाठी हिरवी मेथी आणि ताज्या आवळ्याचा लगदा ताज्या कढीपत्त्यासह बारीक करून केसांमध्ये पॅक बनवा. गरज असल्यास ग्राइंडरमध्ये पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.

ही पेस्ट केसांवर २० ते ३० मिनिटे राहू द्या. आणि नंतर साध्या किंवा कोमट पाण्याने केस धुवा. या हेअर पॅकनंतर केसांना शॅम्पूची गरज नाही कारण हा पॅक अजिबात चिकट नाही. जर ताजी मेथी किंवा आवळा उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुकी मेथी किंवा आवळा पावडर वापरू शकता.

केसगळतीवरही हे गुणकारी आहे

कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट केस मजबूत करतात आणि गळणे थांबवतात. याशिवाय, हे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवून केसांना मुळापासून मजबूत करते. यासाठी खोबरेल तेल गरम करून त्यात १२ ते १५ कढीपत्ता टाका आणि पानांची बाहेरची बाजू काळी पडेपर्यंत तडतडू द्या. आता तेल थंड होऊ द्या. तेल कोमट झाल्यावर टाळूला मसाज करून केसांना लावा. हे तेल गाळून साठवून ठेवा आणि आठवड्यातून दोनदा लावा.

केसांना चमक येते

अंड्यातील पिवळ बलक आणि दही मिक्स करून कढीपत्त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांमध्ये ३० मिनिटे ठेवल्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

कोंडा नियंत्रित करते

तुमच्या केसांमध्ये जास्त कोंडा असल्यास त्यावर उपाय करण्यासाठी कढीपत्ता बारीक करून त्यात दही मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण टाळूवर लावा आणि सोडा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. कढीपत्ता केस लवकर पांढरे होऊ देत नाही, त्यामुळे त्याचा नियमित वापर करावा. ताज्या कढीपत्त्याची पेस्ट मेंदी मिसळून लावल्याने केस मजबूत आणि सुंदर दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईने राजस्थानला दिले दोन धक्के;

Sanjay Raut Nashik Daura : प्रचाराला आले अन् प्रदर्शनात रमले संजय राऊत

SCROLL FOR NEXT