drink
drink sakal
लाइफस्टाइल

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी या आरोग्यदायी पेयांचे नक्की सेवन करावे

Aishwarya Musale

उन्हाळ्याचा हंगाम म्हंटल की, डिहायड्रेशनची समस्या आलीच. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे खूप आवश्यक असते.

पण मधुमेहाच्या रुग्णांना हेल्दी ड्रिंक्स निवडणे थोडे कठीण असते. कारण मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या आहाराची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा गोष्टी ज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यातही अशी पेये घेणे टाळावे ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत काही पेय आम्ही तुम्हला सांगतो. मधुमेहाचे रुग्णही उन्हाळ्यात ही पेय घेऊ शकतात. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

चिया सीड्स

काही तज्ज्ञांच्या मते, चिया सीड्स मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये ओमेगा ३ असते. यासाठी 2 चमचे चिया सीड्स 2 लिटर पाण्यात भिजवा. तुम्ही दिवसभर ते थोडे-थोडे घेऊ शकता. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल.

सत्तू ड्रिंक

भाजलेले हरभरा वापरून सत्तू बनवला जातो. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तुम्ही सत्तू पावडर पाण्यात मिसळून घेऊ शकता. सत्तू पेय शरीराला थंड ठेवते. यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.

ताक

दही आणि पाणी वापरून ताक बनवले जाते. ताक खूप चविष्ट आहे. दुपारी जेवणासोबत ताक पिण्याचा आनंद वेगळाच असतो. अनेकजण त्यात मीठ, जिरे आणि कोथिंबीर टाकूनही पितात.

हे खूप चांगले प्रोबायोटिक आहे. साखरेचे रुग्ण उन्हाळ्यात ताकही पिऊ शकतात. ताकही शरीराला थंड ठेवते. हे देखील तुम्हाला हायड्रेट ठेवते.

क्रॅनबेरी रस

आपण क्रॅनबेरी ज्यूस पिऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई दोन्ही मुबलक प्रमाणात असते. त्याची चव थोडी आंबट असते. अशावेळी तुम्ही त्यात थोडे नारळाचे पाणीही वापरू शकता. हे तुम्हाला बाजारातून सहज मिळेल.

कोकम ज्यूस

कोकमचा ज्यूस आरोग्यासाठी खूप चांगला आहे. उन्हाळ्यात हे पेय शरीराला हायड्रेट आणि थंड ठेवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT