Diwali Recipe 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali Recipe 2023 : उकडीचे मोदक ऐकलेत पण उकडीची चकली हे काय  प्रकरण आहे?

नेहमीच्या चकल्या अन् यात फरक असला तरी चवीत तडजोड करावी लागत नाही

Pooja Karande-Kadam

Diwali Ukadichi Chakli Recipe 2023 :

आजवर तुम्ही मोदकाचे अनेक प्रकार खाल्ले असतील. मोदकाच्या प्रकारात मोडणारे मोमोजही तुम्हाला आवडत असतील. या दोन्ही गोष्टी उकडून आणि फ्राय करूनही केल्या जातात. खायला तितकेच चवदार अन् स्वादिष्ट असणारे हे पदार्थ तब्बेतीसाठी थोडेफार फायद्याचेही ठरतात.

नवरात्रीचा सण संपला अन् प्रत्येकाला आतुरता आहे दिवाळीची. जोवर घरी आई फराळ बनवत नाही तोवर दिवाळी आलीय असं वाटतही नाही. फराळाच्या ताटात हक्काची जागा असणारी चकली सगळ्यांनाच आवडते. पण तुम्ही कधी उकडीच्या चकलीबद्दल ऐकले आहे का?

चवीत अजिबात तडजोड न करता तीच चव देणारी अन् खायला हेल्दी असणारी उकडीची चकली याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत.  उकडीच्या मोदकाची रेसिपी असते अगदी तशीच ही पद्धत आहे. फक्त चकलीचे पिठ मळून न घेता उकडून घ्यावे लागणार आहे.

साहीत्य-

२ वाटी गव्हाचे पीठ, २ चहाचे चमचे तिखट, पाव टी स्पून हळद, १ टे. स्पून तीळ, चिमूटभर ओवा, दीड चमचा मीठ (चवीनुसार). (Diwali Recipe 2023)

कृती :

कणकेमध्ये तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद घालून मिसळावे.

एका मलमलच्या फडक्यात ही कणीक सैलसर बांधावी व साध्या कुकरमध्ये अर्धा तास वाफवून घ्यावी.

वाफवलेली कणीक हाताने मोकळी करावी व पाण्याच्या हाताने मळावी.

मळून पिठाच्या चकल्या कागदावर घालून तेलात तळाव्यात.

महत्वाची गोष्ट

या चकल्या बणवताना कणकेत तेलाचे मोहन घालू नये. त्यामुळे चकल्या कढईत विरघळतात. तसेच, चकल्या काळपट तळू नयेत. पिवळसर व पक्क्या तळाव्यात. काळ्या तळल्या तर करपट लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT