लाइफस्टाइल

Diwali Shopping In Mumbai : दिवाळीची खरेदी तर मुंबईतच करायची: दिवे,लाईट्स,सजावटीच्या वस्तूंची असंख्य व्हरायटी

मुंबईतली दिवाळी, पहा कुठे काय स्वस्त मिळेल!

Pooja Karande-Kadam

Diwali Shopping In Mumbai :

अवघ्या १० दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळी म्हणजे सर्वच गटातील लोकांसाठी आनंद साजरा करण्याचा आणि वाटण्याचा सोहळा असतो. दिवाळीच्या आधी दिवाळीची जोरदार खरेदी केली जाते. दिवाळीसाठी केवळ कपडे नाहीतर दिवे, आकाश कंदील, लाईट्सच्या माळा यांचीही खरेदी केली जाते.

केवळ बाहेरील वस्तू नाहीतर रेडिमेड फराळ, फराळाचा बाझारही केला जातो. दिवाळी खरेदीसाठी मुंबईला जाण्याचा विचार करत असाल, किंवा आता मुंबईतच स्थाईक आहात तर कुठे काय मिळेल याची माहिती तुम्हाला असायला हवीय.

दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. दिवाळीसाठी ड्रेस, साड्या गृह सजावटीच्या वस्तू यांच्या व्हरायटी तुम्हाला मुंबईत मिळतील. मुंबईत होलसेल व्यापाऱ्यांकडे खरेदी केल्याने तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत या वस्तू मिळतात.

लोहार चाळ

दक्षिण मुंबईतील लोहार चाळ परिसर नेहमी विद्युत रोषनाईने नटलेला असतो. कारण, इथे लाईट्सच्या व्हरायटीजचे मोजताही येणार नाहीत इतके प्रकार मिळतात. दिवाळीसाठी तुमचे घर किंवा ऑफिस उजळण्यासाठी इथे दुकानांमध्ये अनेक फॅन्सी दिवे उपलब्ध आहेत. तसेच फुलांच्या माळा, वेगवेगळी तोरणं, फ्लॉअर पॉट्सही इथे मिळतील.

घाऊक बाजारपेठ असल्याने तुम्हाला रास्त भावात उत्पादने मिळतात. आणि जरी त्यांची किंमत तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असली तरी दुकानदार जमवून देतात.

पत्ता: क्रॉफर्ड मार्केटजवळील लोहल चाळ

काय खरेदी करायचे: मेसन जार झुंबर, फेयरी लाइट्स, डान्स लाइट्स, फॅन्सी डेकोरेटिव्ह लाइट्स, रंगीबेरंगी एलईडी लाईट स्ट्रिप्स—सर्व येथे घाऊक किंमती.

फुलांच्या माळा, वेगवेगळी तोरणं, फ्लॉअर पॉट्सही इथे मिळतील

माटुंगा मार्केट

दादर मार्केटपासून दूर असलेल्या माटुंगा मार्केट हे असंख्य डिझाईन्समध्ये लाईट्सच्या व्हरायटी पहायला मिळतील. तुम्ही घर Renew केलं असेल तर तुम्हाला अनेक दिवे अन् लाईट्सचे ऑप्शन इथे मिळतील.

दिवाळीसाठी तुमचे घर उजळून टाकण्यासाठी केवळ १०० रूपयात दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पत्ता: लखमसी नप्पू रोड, माटुंगा पूर्व, मुंबई,

काय खरेदी करायचे: फेयरी लाईट्स, मिर्ची लाईट्स, लाईट्सचे असंख्य प्रकार

भुलेश्वर मार्केट

मुंबईतील भुलेश्वर मार्केट पूर्वी भोलेश्वर मार्केट म्हणून ओळखले जात असे. या मार्केटमध्ये दिवे, सजावटीच्या वस्तू, रांगोळीसाठी रंग आणि स्टॅन्सिल, स्टिकर रांगोळी आणि विविध प्रकारचे मातीचे दिवे स्वस्त दरात मिळतात.

इथे मिळणार रेडिमेड फराळही फेमस आहे. तसेच कपडे खरेदीसाठीही हे मार्केट प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत तुम्हाला साड्यांच्या अनेक व्हरायटी मिळतील. कांजिवरम, जोधपुरी, मारवाडी, नऊवारी, पैठणी तसेच रेग्युलर वापराच्या अनेक व्हरायटी मिळतील.

पत्ता: भुलेश्वर रोड, मरीन लाइन्स ईस्ट, पांजरपोळ, भुलेश्वर, मुंबई

काय खरेदी कराल: लायटिंगच्या माळा, तोरण, कंदील, स्टॅन्सिल, रांगोळी, स्टिकर रांगोळी

साड्या,ड्रेस अन् ज्वेलरीसाठीचे भांडार आहे हे मार्केट

हिंदमाता मार्केट

हिंदमाता क्लॉथ मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे मिळतील.केवळ कपडे नाहीतर ड्रेस शिवण्यासाठीचे कापड, कटपीस,साडया, मुलांसाठीचे कपडे यांची भरपूर व्हरायटी इथे तुम्हाला मिळेल.

तुमचं मोठं कुटुंब असेल आणि सगळ्यांचे एकाच प्रकारचे कपडे घ्यायचे असतील तर याच मार्केटला भेट द्या. कारण, तुम्ही इथे अगदी २५ रूपयाला एक साडी इथे खरेदी करू शकता. इथला नियम इतकाच आहे की तुम्ही एकाच प्रकारच्या १२ साड्या, किंवा अर्धा डझन साड्या खरेदी कराव्यात.

तुम्हाला योग्य वस्तू शोधण्यात मदत करण्यासाठी या मार्केटमध्ये भरपूर दुकाने आणि बुटीक आहेत. Nike, पुमा, रिबॉक इत्यादी ब्रँडेड वस्तूंचे कारखानेही या भागात आहेत. मुंबईत ‘कमी खर्चात ब्रँडेड दिवाळी’ साजरी करायची असेल तर हिंदमाता मार्केट हे तुमच्यासाठी ठिकाण आहे.

पत्ता: बाबा साहेब आंबेडकर मार्ग, दादर, मुंबई

इथे काय मिळेल: कपडे

या मार्केटमध्ये भरपूर दुकाने आणि बुटीक आहेत

हाजी अली मार्केट

सुंदर, रंगीबेरंगी कंदील, कलाकुसरीच्या यामुळे दिवाळीच्या आनंदात भरच पडते. याशिवाय घराची सजावटही पूर्ण होत नाही. हाजी अली परिसरातील सुप्रसिद्ध हीरा पन्ना शॉपिंग मार्केटमध्ये व्हरायटी हवी असलेल्या दुकानदारांसाठी नेहमीच गर्दी असते. इथे तुम्ही ब्रँडेड घड्याळे, पादत्राणे, गॅझेट्स इत्यादींची कॉपी देखील स्वस्तात खरेदी करू शकता.

पत्ता: हाजी अली, मुंबई, महाराष्ट्र

काय खरेदी करावे: कंदील, हस्तकला, कलाकृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT