diwali 2022 esakal
लाइफस्टाइल

Diwali Vastu Tips : दिवाळीपूर्वी घरातून या वस्तू बाहेर काढा आणि घरात सुख समृद्धी आणा

दिवाळी दरवर्षी नवा उत्साह घेऊन येते

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दिवाळी दरवर्षी नवा उत्साह घेऊन येते. खाद्य पदार्थ, नवे कपडे, पाहुणे यांची रेलचेल असते. तर घरातील स्त्री वर्ग किचनमध्ये फराळ तर अंगणात स्वच्छता आणि सजावट करण्यात महिला मग्न आहेत. कारण दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते. अशी मान्यता आहे की, माता लक्ष्मी प्रत्येक घरात प्रवेश करते.

जे घर स्वच्छ सुंदर आणि शांत असेल तिथे ती नांदते. त्यामुळे तूटलेल्या वस्तू अस्वच्छता असलेल्या घरात, कलह असलेल्या घरात ती कधीही थांबत नाही. यंदा 24 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरूवात होणार आहे. त्याआधी जाणून घेऊयत की, कोणत्या वस्तू घराबाहेर फेकल्य पाहिजेत.

शास्त्रानूसार या वस्तू घरात ठेवू नयेत

घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या अवस्थेत वापरू नका. त्या वस्तू वापरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याचा परिणाम म्हणून घरात वाद सुरू होतात.दिवाळी हा सण सुख-समृद्धीचा सण आहे. दिवाळीला घराची साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेल्या किंवा तुटलेल्या काचेच्या वस्तू फेकून द्या. घराच्या खिडकीच्या काचा तूटल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या.

घरात असलेली बंद घड्याळे वापरू नयेत असा सल्ला वास्तूशास्त्र देते. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका. घड्याळ हे वेळ दाखवते त्यामुळे त्याला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते असे मानले जाते.दिवाळीची स्वच्छता करताना तूटलेले फ्लॉवर पॉट, निसर्ग चित्राचे फ्रेम्स ठेवणं चांगलं नसतं. त्यामुळे या वस्तू फेकून द्या. पून्हा दुरूस्त करून वापरू नका.

बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण फेकून द्यायला कचवचतो. तसे करू नका. आता प्रत्येक घरात कितीतरी बंद पडलेले मोबाईल असतील. जुने रेडीओ, टीव्ही हेही ठेऊ नका.घराचे मेन गेट, सर्व दरवाजे, फर्निचरमध्ये गंजले आहे का. त्यातून आवाज येतोय का हेही पहा. दिवाळीपूर्वीच फर्निचर आणि इतर वस्तूंची दुरुस्ती करावी. पलंग तूटलेला असेल तर तो वापरू नये. त्यामुळे वैवाहीक जीवनावर वाईट परिणाम होतो.

घरामध्ये ठेवलेली जुनी व तुटलेली भांडी, खेळणी, सजावटीच्या वस्तू, कपडे, चप्पल आणि फाटलेल्या चादरी त्वरीत घरातून फेकून द्या. दिवाळीला गेल्या वर्षीचे दिवे लावू नका. प्रत्येक वर्षी नविन दिवे खरेदी करून लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT