Difference Between Hijab, Niqab & Burqa
Difference Between Hijab, Niqab & Burqa 
लाइफस्टाइल

बुरखा, नकाब, हिजाब यांच्यातील फरक माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

जगभरामध्ये वेगवगळ्या संस्कृतीमध्ये महिलांना डोक किंवा केस झाकून ठेवण्याच्या वेगळ्या पध्दती आहे. इस्लाममध्ये महिलांना आपल्या वडील (Father) किंवा पतीसमोर (Husband) किंवा इतर बाहेरच्या व्यक्तींसमोर स्वत:ला झाकून ठेवा असे सांगितले जाते. अशामध्ये महिला (Women) स्वत:ला झाकून ठेवण्यासाठी एका विशेष प्रकारचा पोषाख वापरतात. भारत, पाकिस्तान, ईरान, इराक, अमेरिका, इंग्लंडसहीत सर्व जगामध्ये कित्येक मुस्लिम महिला डोक्यापासून पायापर्यंत एक मोठा कपडा परिधान करतात ज्याला हिजाब म्हणतात. (Do you know the difference between burqa, niqab hijab, Abaya, Al Amira)

जगभरात हिजाब (Hijab) संबधी अनेक समजुती आहेत. जिथे एकीकडे सौदी अरब, इरान, इराकमध्ये कित्येक जागांवर डोक झाकल्याशिवाय घराबाहेर पडणाऱ्या महिलांचा पुरुष विरोध करतात आणि महिलांना जीवे मारण्याची धमकी देतात. तर युरोपमधील कित्येक देशांमध्ये हिजाब वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. डेनमार्कचे प्रधानमंत्रीनुसार, त्यांच्या देशामध्ये कोणतीही महिला आपला चेहरा पूर्ण झाकून सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाही.

जिथे एकीकडे धार्मिक आणि सामाजिक पातळीवर मुस्लिम महिलांच्या पोषाखांसंबधी काही गैरसमज देखील आहेत. तसेच पोषाखांचे प्रकार गैर-मुस्लिम लोकांना गोंधळात टाकातात. हिजाब, बुरखा, अबाया, अल-अमीरा असे वेगवेगळे प्रकार असले तरी त्याचे काम मात्र एकच आहे, ते म्हणजे महिलांचे शरीर आणि केस झाकणे जेणेकरून तिला पाहून कोणत्याही पुरुषाचा तोल जाऊ नये.

मुस्लिम महिलांच्या या पोषाखांमध्ये काही ना काही अंतर आहे.

हिजाब: आधुनिक इस्लामध्ये हिजाबचा अर्थ आहे पर्दा. कुराणमध्ये हिजाबचा उल्लेख कपड्यांसबधी नव्हे तर एका पडद्याच्या स्वरुपात केला आहे जे महिला आणि पुरुषांच्या दरम्यान असला पाहिजे. कुराणमध्ये मुसलमान पुरुष आणि महिलांमध्ये दोघांमध्ये चांगले कपडे( Decent Cloths) वापरण्याचा आदेश दिला आहे. यामध्य कपड्यांसाठी खिमर (डोके झाकण्यासाठी ) आणि जिल्बाब(लबादा) शब्दांचा उल्लेख केला आहे. हिजाबच्या अंतर्गत महिला आणि पुरुष दोघांना मोकळे आणि आरामदायी कपडे वापरण्यास सांगितले आहे. तसेच आपले डोके झाकण्यासही सांगितले आहे.

नकाब : नकाब किंवा निकाब हे चेहरा लपविण्यासाठीचे कपडा आहेय यामध्ये डोके पूर्णपणे झाकलेले असते आणि इस्लाममध्ये कुठेही चेहरा लपविण्याचा उल्लेख केलेला नाही फक्त डोकं आणि केस झाकण्याचा उल्लेख केला आहे. पण कट्टरपंथी देशांमध्ये महिलांना आपला चेहरा लपविण्याचा आदेश दिला आहे. अशावेळी नकाब डोक, चेहारा झाकण्यासाठी वापरला जातो. नकाबमधून फक्त डोळे दिसतात. नकाबचा हा कपडा महिलांच्या गळा किंवा खांद्यापर्यंतचा भाग झाकतो. साधारणपणे हा काळा रंगाच्या कपडा असतो जो पीनच्या मदतीने बांधलेला असतो.

बुरखा : भारतामध्ये सहसा मुस्लिम महिला परिधान करतात त्या काळा लबादा सारखा पोषाखाला बुरखा म्हणतात पण बुरखा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. नकाबचा पुढचा टप्पा म्हणजे बुरखा आहे. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून पूर्ण चेहरा झाकला जातो. तिथे बुरख्यामध्ये डोळे देखील झाकलेले असतात. डोळ्यांच्या ठिकाणी जाळी किंवा पातळ कापज असते ज्यामधून आक-पार दिसू शकते. तसेच यासोबतच संपूर्ण शरीरावर विना फिटिंगचा लबादा असतो. याचा रंग एकसारखा असतो ज्यामध्ये परपुरुष आकर्षित होणार नाही.

अल-अमीरा: हा दोन कपड्यांचा सेट आहे. एका कपडा टोपी सारखा डोक्यावर परिधान करतात आणि दुसरा थोडा मोठा ज्याला खांद्यावर गुंडाळतात.

अबाया

अबाया : हा तो पोशाक आहे ज्याला भारतामध्ये बुरख्या म्हणतात, यालाच मिडिल ईस्टमध्ये अबाया म्हटले जाते. हा लाब पोषाक आहे जो महिला आत परिधान केलेल्या कपड्यांवर वापरू शकतात. त्यामध्ये डोक्याला एक स्कार्फ असतो ज्यामध्ये केस झाकलेले असतात आणि चेहरा दिसतो. आता फॅशननुसार यामध्ये कित्येक रंगामध्ये उपलब्ध आहे.

ओढणी : पाकिस्तान आणि भारतामध्ये सलवार-कुर्तासोबत महिला डोक झाकण्यासाठी ओढणीचा वापर करतात. ओढणी सलवार-कमीजचा भाग असते. याचा मुख्या उद्देश डोके झाकणे असतो. इस्लाम शिवाय भारतामध्ये बहूतेक हिंदू महिला देखील डोक झाकण्यासाठी ओढणी वापरतात. राजस्थान आणि हरियामध्ये कित्येक ठिकाणी महिलांना चेहरा झाकूनच घरातील काम करावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

SCROLL FOR NEXT