Nail Extensions Tips esakal
लाइफस्टाइल

Nail Extensions : नेल एक्स्टेंशन करताय? सावधान... या चुका पडू शकतात महागात..

मुळात नेल एक्सटेन्शन हे अगदीच १० मिनिटात होणारी गोष्ट आहे यासाठी अनेक प्रकारचे डिझाईन्स सुद्धा मिळतात.

सकाळ डिजिटल टीम

Nail Extensions Tips : आपली नखे सुंदर दिसावी यासाठी आपण त्यांची खूप निगा राखतो अनेकदा आपण यासाठी मॅनिक्युअरचा पर्याय देखील अवलंबतो; रोजच्या कामात नखांची निगा राखता येतेच असं नाही शिवाय अनेकदा आपल्यालाच रोजच्या कामात मोठी नखं नको असतात. 

याला पर्याय म्हणजे नेल एक्सटेन्शन.. मुळात नेल एक्सटेन्शन हे अगदीच १० मिनिटात होणारी गोष्ट आहे. यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे डिझाईन्स सुद्धा मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही सर्व प्रकारच्या नखांवर नेल एक्स्टेंशन करू शकत नाही. 

नेल एक्सटेन्शन करून घेण्यासाठी तुमची नखे मजबूत असली पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला नेल केअर रुटीनकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच, कोरड्या आणि सोललेल्या नखांवर नेल एक्स्टेंशन करू नये.

अशा नखांवर नेल एक्स्टेंशन करू नका

  • जर तुमच्या नखांची त्वचा कोरडी राहिली आणि या कारणाने ती कापली गेली तर तुम्ही नखे वाढवणे थोडेसे टाळावे. यासाठी, सर्वप्रथम तुमच्या नखांची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे.

  • जर तुमची नखे पातळ असतील आणि लवकरच तुटत असतील, तर नेल एक्स्टेंशन करू नका.  याचे कारण असे की तुमची नखे आधीच खूप कमकुवत आहेत आणि जर तुम्ही अशा नखांवर एक्स्टेंशन केले तर नखे मुळापासून तुटतील.

अशा प्रकारे नखांची काळजी घ्या

  • नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी घरी मॅनिक्युअर करणे आवश्यक आहे जेणेकरुन तुमचे नखे मजबूत आणि सुंदरही दिसतील.

  • नेल सीरमचाही वापर करा जेणेकरुन तुमचे नखे कोरडे होण्यापासून वाचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT