Dressing Tips esakal
लाइफस्टाइल

Dressing Tips : उंची कमी आहे? फॉलो करा हा फॅशन ट्रेंड! दिसाल उंच

कमी उंचीच्या महिला वेस्टर्न वेअरमध्ये खूप सुंदर दिसतात

सकाळ डिजिटल टीम

Dressing Tips : कमी उंचीच्या महिला वेस्टर्न वेअरमध्ये खूप सुंदर दिसतात. पण कधी कधी पारंपारिक प्रसंगी पारंपारिक ड्रेसही घालावे लागतात. मग अशावेळी एथनिक कपडे घातल्यानंतर शॉर्ट महिलांची उंची आणखी कमी दिसते. म्हणून यावर उपाय म्हणून अनेक महिला सलवार सूट घातल्यानंतर इच्छेविरुद्ध हाय हिल्स घालतात.

सलवार सूटमुळे महिलांचा पारंपारिक लुक कंम्प्लिट होतो खरा पण त्यांना हाय हिल्स घातल्याने त्रास होतो. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्हाला स्टायलिश डिझायनर सूट घातलेल्या उंच मुलींना पाहून निराश होण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सलवार सूट घालण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिल्स न घालता उंच आणि सुंदर दिसू शकता.

डार्क कलारचा ड्रेस ट्राय करा

हलक्या रंगाचा सलवार सूट घातल्यास महिलांची उंची लहान दिसते. जर तुमची उंची कमी असेल, तर डार्क रंगाचा ड्रेस घालणे तुमच्यासाठी योग्य आहे. दुसरीकडे, काळा, गडद निळा आणि मरून अशा गडद रंगांचा सलवार सूट घातल्याने तुमचा लूक टॉल दिसतो. म्हणून आपल्यावर सुट होणाऱ्या डार्क रंगाचा सलवार सुट ट्राय करा.

फुल स्लीव्ह वापरा

आजकाल पफ आणि कट स्लीव्हज असलेले सलवार सूट खूप ट्रेंडिंग आहेत. परंतु कमी उंचीच्या महिलांनी पूर्ण आणि ¾ स्लीव्ह सूट घालावे. फुल स्लीव्ह घातल्याने तुमची उंचीही अधिक खुलून दिसते.

वर्टिकल प्रिंट

हॉरिजॉन्टल प्रिटं असलेले सलवार सूट स्त्रियांना खूप आवडतात. अनेकदा महिला वेगवेगळ्या रंगाचे हॉरिजॉन्टल प्रिटं सुट घालताना दिसतात. पण त्यामुळे महिलांची उंची कमी दिसू लागते. म्हणून कमी उंचीच्या महिला वर्टिकल प्रिंटचा सलवार सूट घालून टॉल लूक कॅरी करू शकतात.

फॅब्रिक सुटचा वापर करा

सलवार सूटचे फॅब्रिक देखील तुमची उंची दर्शविण्यास मदत करते. कमी उंचीच्या महिलांसाठी मखमली, जॉर्जेट आणि शिफॉनचे कपडे घालणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुमची उंची दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT