Dry Cough Home Remedies esakal
लाइफस्टाइल

Dry Cough Home Remedies : काही केल्या कोरडा खोकला जातच नाहीय? हे Home Made टॉनिक लगेचच सुरू करा!

कोरडा खोकला त्रासदायक असतो त्यामुळेच त्यावर लवकर उपाय करावे लागतात

Pooja Karande-Kadam

Dry Cough Home Remedies : पावसाळा येताच सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांना जड जाते. या मोसमात अनेक वेळा पावसात न भिजताही कोरड्या खोकल्याची समस्या उद्भवू लागते. आज आम्ही कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी एक अतिशय सामान्य घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही काही दिवसात कोरड्या खोकल्यापासून सहज सुटका करू शकता.

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते. (Dry Cough Home Remedies : dry cough home remedies DIY dry cough tonic)

अ‍ॅलर्जीपासून अ‍ॅसिड रिफ्लक्सपर्यंत अनेक गोष्टी या कोरड्या खोकल्याचे कारण बनू शकतात. तर काही प्रकरणांमध्ये कोरडा खोकला होण्यामागे काही विशेष कारण सुद्धा नसते.

कारण असो वा नसो, पण एक गोष्ट लक्षात घ्या की सतत होणारा कोरडा खोकला हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर मात्र मोठा गंभीर परिणाम करू शकतो. त्यात जर हा खोकला रात्रीचा सुरू झाला तर मात्र दिवस आणि रात्र दोन्ही खराब झालीच म्हणून समजा.(Cold And Cough)

आज आम्ही कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक अतिशय सामान्य घरगुती उपाय आणला आहे, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही काही दिवसात कोरड्या खोकल्यापासून सहज सुटका मिळवू शकता, तर चला जाणून घेऊया कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी टॉनिक कसे बनवायचे.

ही कृती काळी मिरी आणि तुळस यांच्या मदतीने तयार केली जाते. काळी मिरी हे व्हिटॅमिन सी सारख्या गुणधर्मांचे भांडार आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

दुसरीकडे, तुळशीमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, जे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यास मदत करतात, तर चला जाणून घेऊया. (Dry Cough Remedies In Marathi)

कोरडा खोकला किती दिवस दमवतो

जर एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला झाला असेल तर तो 8 आठवडे राहू शकतो. म्हणून कोरड्या खोकल्याला क्रॉनिक म्हटले जाते. कारण मोठ्या माणसांमध्ये 8 आणि लहान मुलांमध्ये 4 आठवडे हा खोकला राहू शकतो. यापेक्षा जास्त वेळ जर खोकला राहिला तर मात्र फुफ्फुसांमध्ये कॅन्सर झाल्याचे संकेत असू शकतात. (Monsoon Health Tips)

सामान्यत: कोरडा खोकला रात्रीच्या वेळी जास्त त्रास देतो. अनेकदा हा खोकला कंट्रोल करण्यासाठी प्यायलेले ड्राय कफ सिरपसुद्धा बिनकामाचे ठरते. अशावेळी तुम्ही काय काय घरगुती उपाय करू शकता ते जाणून घेऊया.

कोरड्या खोकल्याचे टॉनिक बनवण्यासाठी साहित्य-

  • 10 काळी मिरी

  • मूठभर तुळशीची पाने

  • 6 कप पाणी

कोरड्या खोकल्याचे टॉनिक कसे बनवायचे?

  1. कोरड्या खोकल्याला टॉनिक बनवण्यासाठी सर्व प्रथम पॅन घ्या.

  2. नंतर 10 काळी मिरी घेऊन त्या चांगल्या ठेचून घ्या.

  3. यानंतर एका पॅनमध्ये 6 कप पाणी आणि ठेचलेली काळी मिरी घाला.

  4. यासोबतच त्यात मुठभर तुळशीची पानेही टाका.

  5. मग तुम्ही ते साधारण दीड तास चांगले शिजवा.

  6. यानंतर, ते एका कपमध्ये गाळून घ्या.

  7. आता तुमचे कोरड्या खोकल्याचे टॉनिक तयार आहे.

  8. मग तुम्ही ते थोडे गरम करून रोज एक ते दीड कप प्या.

  9. यामुळे कोरड्या खोकल्यापासून हळूहळू सुटका मिळते. (Tonic)

आलेही देईल कोरड्या खोकल्यापासून आराम

एका संशोधनानुसार, असे आढळून आले की आल्यामध्ये अँटीमायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया नष्ट करणारे गुणधर्म असत्तात. अशावेळी कोरड्या खोकल्यापासून आराम देण्यासाठी आले तुमची मदत करू शकते.

आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन त्यावर एक चिमूटभर मीठ किंवा मध लावा आणि हा तुकडा दातांच्या खाली दाबून ठेवा. आता अशाच प्रकारे आल्याचा रस हळूहळू आत तोंडात जाऊ द्या. जवळपास 5 ते 7 मिनिटे ठेवून मग गुळण्या करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT