Dry Skin Care esakal
लाइफस्टाइल

Dry Skin Care : सकाळी उठताबरोबर चेहऱ्यावर ताण जाणवतो? करा हा उपाय

योग्य आहार आणि पुरेसे पाणी पिणे यावर योग्य उपाय ठरू शकतो

साक्षी राऊत

Dry Skin Care : आक्टोबर महिना संपायला येताच थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. थंडीमध्ये ड्राय स्किनची समस्या जाणवते. अशात स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करायला हव्यात. योग्य आहार आणि पुरेसे पाणी पिणे यावर योग्य उपाय ठरू शकतो. बहुतांश लोकांना सकाळी उठल्याबरोबर चेहऱ्यावर ताण जाणवतो. अशावेळी तुम्ही या काही उपायांचा अवलंब करू शकता.

सकाळी चेहऱ्यावर ड्रायनेस जाणवल्यास करा हे उपाय

सकाळी चेहऱ्यावर फार जास्त ताण जाणवत असेल तर सगळ्यात आधी चेहरा पाण्याने धुवून घ्या. नंतर हलक्या हाताने चेहरा पुसून घ्या. आता कोकोनट ऑइल हातावर घ्या आणि चेहऱ्यावर लावा. तुम्ही या तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता. यात असलेला तेलकटपणा चेहऱ्यावरील ड्रायनेस घालवण्यास मदत करतात.

ड्राय स्किन आणि ताण कमी करण्यासाठी तुम्ही मलाईचा वापरसुद्धा करू शकता. यासाठी फ्रेश मलाई घ्या. मलाई हातावर घेत चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील ड्रायनेस कमी होतो.

तुम्ही चेहऱ्यासाठी मधाचाही वापर करू शकता. यात अनेक व्हिटॅमिन्स असतात जे स्किनला मॉश्चराइज करतात. एक चमचा मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT